Weather Forecast For Tomorrow: भारतीय हवामान खात्याने (IMD) जुलै महिन्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. जुलैमध्ये राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ठाणे, नवी मुंबई पनवेलमध्ये गेल्या 24 तासांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. राज्यातील काही भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला असून काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात आज पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून याठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, आज मुंबई शहर आणि परिसरातील वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच कोकणातील जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Weather Update Tomorrow 2024: देशातील उद्याचे हवामान? जाणून घ्या, 5 जुलै रोजीचे हवामान अंदाज)
मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, 8 जुलै रोजी नांदेड, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर व परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्यांच्या वेगासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तथापी, मराठवाडयात 05 ते 11 जूलै व 12 ते 18 जुलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात 10 ते 16 जूलै 2024 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. (Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!)
7 July, Thane district, Navi Mumbai Panvel recd heavy to very heavy rainfall in past 24 hrs. 📌📌
Mumbai recd widespread moderate rainfall. Most of it came during night. pic.twitter.com/aLkiYLzc1h
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 7, 2024
पुढील काही तासांत ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तथापी, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात वादळ, वारा आणि विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.