Pune Weather Prediction, July 8: पुण्यात आज, 6 जुलै 2024 रोजी तापमान 24.65 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 23.67 °C आणि 25.87 °C दर्शवतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज पुण्यात घाट विभागात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवता त्या भागात ऑरेंज अलर्ट जारी केले आहे.पुणे आणि लगतच्या भागामध्ये पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने वर्तवला आहे. आयएमडीने हवामानाचा अंदाज वर्तवताना म्हटले आहे की, शनिवार आणि रविवार पुण्यात अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा सध्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या प्रदेशांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस अपेक्षित आहे, विशेषत: घाट भागात. आता पुण्यात उद्याचे हवामान कसे असेल ह्यासाठी हवामान विभागने पुण्याचे उद्याचे हवामान अंदाज लावला आहे. हेही वाचा: Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
पुण्यात उडायचे हवामान अंदाज?
6 जुलै रोजी, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये, त्यानंतर 6 आणि 7 जुलै रोजी आसाम आणि मेघालय आणि 7 जुलै रोजी ओडिशामध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. पुणे आणि कोल्हापूर परिसरातही मुसळधार ते अतिवृष्टी होऊ शकते. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात वादळासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जुलैमध्ये सामान्यपेक्षा 106 टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग वगळता उर्वरित राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल.