Mumbai Weather Prediction, July 6: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) आज, ५ जुलै रोजी शहर आणि उपनगरात अधूनमधून मध्यम स्वरूपाच्या पावसासह ढगाळ वातावरण असेल असा अंदाज वर्तवला आहे.हवामान खात्याने असेही म्हटले आहे की कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 अंश सेल्सिअस आणि 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मान्सूनचा जोर वाढल्याने पुढील आठवड्यात मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.गुरुवारी मुंबईच्या काही भागात हलकासा पाऊस झाला. IMD कुलाबा आणि सांताक्रूझ हवामान केंद्रांमध्ये 3 मिमी आणि 2 मिमी पावसाची नोंद झाली.आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४८ तासांत कोकणासह विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच शुक्रवारी मुंबईत यल्लो अलर्ट जारी केला आहे . शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान खात्याने 8 जुलैपर्यंतच्या अंदाजात शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, त्यानंतर मुंबईत मुसळधार पाऊस सुरू होऊ शकतो.आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान विभागने मुंबईत उद्याचे हवामान कसे ह्याच अंदाज लावला आहे. हेही वाचा: Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
मुंबईत उद्याचे हवामान कसे?
IMD ने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिकमध्येही विलग घाट भागात मुसळधार पाऊस पडेल.रत्नागिरी आणि पुण्यात एकाकी घाट भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. या व्यतिरिक्त, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ येथे विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता वर्तवण्यात आली असून, या भागांना यल्लो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.