सौदी एअरलाइन्स मध्ये महिला कर्मचाऱ्यासमोर तरुणाचे अश्लील चाळे
Saudi Arabian Airlines (Photo Credits: Wikipedia)

सौदी एअरलाइन्समधील एका प्रवाशाने प्रवासादरम्यान महिला कर्मचाऱ्यासमोर अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रवासी जेद्दाह ते नवी दिल्ली असा प्रवास करत होता. अब्दुल शाहीद शमसुद्दीन असे त्याचे नाव असून तो केरळच्या कोट्टायम येथील रहिवासी आहे.

24 वर्षीय अब्दुल शाहीद शमसुद्दीन याला विमानातील महिला कर्मचाऱ्याने धुम्रपान करण्यापासून रोखल्याने त्याने अश्लिल वर्तन केले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धुम्रपान करण्यापासून रोखल्याने प्रवाशाने विमानात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिला कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांना मदतीसाठी बोलावले तेव्हा त्याने पँट काढून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. दिल्ली: चालत्या बाईकवर अश्लील चाळे करताना कपल कॅमेऱ्यात कैद; IPS अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ (Viral Video)

या प्रकरणी सीआयएसएफला माहिती देण्यात आली असून जवानांनी प्रवाशाला ताब्यात घेतले आहे. तसंच पुढील कारवाईसाठी त्याला दिल्ली पोलिसांकडे सोपवण्यात आलं असून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.