दिल्ली: चालत्या बाईकवर अश्लील चाळे करताना कपल कॅमेऱ्यात कैद; IPS अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ (Viral Video)
Delhi couple caight on camera while making out in Rajouri Garden (Photo Credits: Twitter)

सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगुलांच्या अश्लील चाळे अलिकडच्या काळात अधिकच वाढताना दिसत आहेत. दिल्लीतून असा एक अश्लील चाळ्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. दिल्लीतील एक कपल बाईकवरुन जाताना मेकआऊट करत असल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील राजोरी गार्डन येथील ही घटना असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसंच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नव्या ट्रॅफिक नियमांची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे. हैदराबाद मेट्रो स्टेशनच्या लिफ्टमध्ये तरूण कपल्स Kiss करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Viral Video)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत मुलगा बाईक चालवत आहे तर मुलगी त्याच्या समोर बसली आहे. त्यांचे अश्लील चाळे व्हिडिओत कैद करुन IPS अधिकाऱ्याने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की, "मोटार व्हेहिकल अॅक्टचे उल्लंघन केल्याप्रकरणी काही नवी नियम असणे गरजेचे आहे. राजोरी गार्डन क्रॉसिंग."

पहा व्हिडिओ:

 

गेल्या वर्षी मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे एका कपलचा अश्लिल प्रकार रेकॉर्ड झाला होता. तो व्हिडिओ देखील सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला होता. त्या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले होते. मात्र पुरुषाला तेथून पळ काढण्यात यश आले होते.