Attacks on the security forces in Jammu and Kashmir (Photo Credit: ANI)

जम्मू काश्मीर येथील पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील सीआरपीएफच्या (CRPF) जवानांवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सुमारे 8 जवान शहीद झाले आहेत. अवंतीपूराहून लष्कराचे जवान जात असताना त्यांच्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात IED चा वापर करण्यात आला होता.  जखमी जवानांवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सध्या लष्कराच्या जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीर: पुलवामा येथे बॉम्बस्फोट, 16 जखमी

IED स्फोटानंतर अंदाधूंद  गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र हे दहशतवादी नेमक्या कोणत्या संघटनेचे आहेत याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

Pulwama: IED blast followed by gunshots in Goripora area of Awantipora, more details awaited. #JammuandKashmir pic.twitter.com/zf65k7cho9

बुधवारी (13/2/2019)  पुलवामा जिल्ह्यातील एका कोचिंग क्लासमध्ये झालेल्या स्फोटात 28 विद्यार्थी जखमी झाले होते.