जम्मू आणि काश्मीर: पुलवामा येथे बॉम्बस्फोट, 16 जखमी
file photo (Photo Credits: ANI )

Jammu and Kashmir: दक्षिण काश्मीर येथील पुलवामा (Pulwama) येथील एका खासगी कोचिक सेंटर जवळ संशयास्पद स्फोट झाल्याचे वृत्त आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र, या स्फोटात 16 विद्यार्थी जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्या आले आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका खासगी शाळेत वर्ग सुरु होता. या वर्गात नववी आणि दहावी इयत्तेतील विद्यार्थी शिकत होते. दरम्यान, अचानक स्फोट झाला. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, तपास सुरु आहे.

प्राथमीक माहिती अशी की, रतनीपूर येथे एक दिवसापूर्वी एनकाउंटर झाले होते. या ठिकाणाहून इयत्ता दहावीच्या वर्गातील एक विद्यार्थी एक्सप्लोसिव घेऊन येत होता. या विद्यार्थ्याच्या बॅगमध्येच स्फोटक असल्याचे बोलले जात आहे. अधिक तापस सुरु आहे.