Jammu and Kashmir (Photo Credits: IANS)

जम्मू मधील ऐतिहासिक ओळख असणाऱ्या सिटी चौकाला (City Chowk) 'भारत माता चौक' (Bharat Mata Chowk)असे नाव देण्यात आले आहे. या सिटी चौकाचे नाव बदलण्यात यावे अशी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत होती. त्यामुळे चौकाचे नाव बदलण्याबबात भाजपप्रणित जम्मू महापालिकेच्या सभागृहात याचा ठराव पास करण्यात आल्याची माहिती रविवारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. परंतु चौकाचे नामकरण करण्यात आल्यानंतर नागरिकांकडून संमिश्र पद्धतीच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या आहे. तसेच काही जणांची भारत माता चौक हे नाव दिल्याने त्याचे स्वागत केले आहे. परंतु जम्मू महापालिका यांना चौकांच्या नावात बदल करण्याऐवजी विकास आणि स्वच्छता याकडे अधिक लक्ष द्यायचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चार महिन्यांपूर्वी सिटी चौकाचे नाव बदलण्यात यावे यासाठी एक ठराव सभागृहात मांडला होता. चौकाचे नाव बदलण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती असे जम्मू महापालिका महापौर पूर्णिमा शर्मा यांनी म्हटले आहे. त्यामुळेच सिटी चौकाचा ठराव मंजूर होत त्याला भारत माता चौक असे नाव देण्यात आले आहे. ही जागा ऐतिहासिक आणि काही महत्वाचे निर्णय, आंदोलन याचे साक्षीदार आहे. प्रत्येक वर्षी नागरिकांकडून येथे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या वेळी झेंडावंदन केले जाते.(कोलकाता: पश्चिम बंगाल मध्ये येत्या विधानसभा निवडणूकीत भाजप बहुमताने सत्ता स्थापन करणार, अमित शहा यांचा ममता बॅनर्जी यांना इशारा)

तर नागरिकांनीच या ठिकाणाचे नाव बदलण्यात याले अशी मागणी केली होती. शहरातील पंजतिर्थी याचे नाव सुद्धा बदलून 'अटल चौक' करण्यात आले आहे. तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव चौकाला दिले आहे.