कोलकाता: पश्चिम बंगाल मध्ये येत्या विधानसभा निवडणूकीत भाजप बहुमताने सत्ता स्थापन करणार, अमित शहा यांचा ममता बॅनर्जी यांना इशारा
Amit Shah (Photo Credits-ANI)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) रविवारी (1 मार्च) एकदिवशीय दौऱ्यासाठी कोलकाता (Kolkata) येथे आले आहेत. यावेळी अमित शहा यांनी एका सभेचे आयोजन करत नागरिकांना संबोधत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला केला. अमित शहा यांनी असे म्हटले की, आम्ही जेव्हा बंगाल मधील निवडणूक उतरलो त्यावेळी ममता दीदी म्हणायच्या जमानत वाचवेल. परंतु येत्या विधानसभा निवडणूकीत पूर्ण बहुमताने भाजप त्यांची सत्ता बंगाल मध्ये स्थापन करणार आहे. त्यांनी पुढे असे ही म्हटले की, आम्ही प्रचार करण्यासाठी आलो होते. पण आम्हाला रॅली काढण्यास दिली नाही. कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. परंतु ममता दीदी तुम्ही हे सर्व करुन आम्हाला थांबवले. 'जेवढे अपराध करायचे आहेत करा' कारण बंगाल मधील जनतेचे तुम्हाला आता ओळखले आहे.

अमित शहा यांनी असे म्हटले की, भाजपने एक अभियान सुरु केले आहे. त्यानुसार#AarNoiAnnay (अजून अन्याय नाही) असे त्याचे उद्दिष्ट आहे. बंगालमधील हुकूमशहा शक्तींचा पराभव करण्याचा हा लढा आहे. जनतेला दाबण्याची, जुलूमशाहीची, भ्रष्टाचाराची, त्याच्या राजकुमारला वारसदार बनविण्याची विचारसरणी यापुढे बंगालमध्ये चालणार नाही. तर कोलकाता येथे गेल्यावर अमित शहा यांना नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे काळे झेंडे दाखवले.(Delhi Violence: केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, हिंसाचारादरम्यान घरे खाक झालेल्यांना 25 हजार रुपयांची मदत)

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये लोकसा निवडणूकीपासूनच आरोपप्रत्यारोप करण्यात येत आहेत. एका बाजूला भाजप ममता बॅनर्जी यांना हरवू पाहत आहे. तर भाजपला आपली मुळे प्रस्थापित करण्यात भाजपाला यश आले आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी टीएमसीचे अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले. या काळात निवडणुकीचा निकाल, पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जीच्या लोकसभेच्या 42 जागांवर टीएमसीला 22 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 18 जागा मिळाल्या आहेत. या वाढीनंतर संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये भाजपने lत्यांचे कमळ फुलवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.