उत्तर पूर्व दिल्ली मध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. परंतु या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने यामध्ये 42 जणांनी आपला जीव गमावला असून 250 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली हिंसाचारातील पीडितांना दिलासा देण्यासाठी एक निर्णय घेतला आहे. त्यानुसार हिंसेदरम्यान ज्या स्थानिकांची घरे जाळण्यात आली त्यांना तातडीने 25 हजार रुपयांची मदत उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे.
केजरीवाल यांनी हिंसाचारात घर खाक झालेल्यांना मदती करण्यास उद्यापासून सुरुवात करणार आहे. पीडितांना 25-25 हजार रुपयांची रोख रक्कम दिली जाणार आहे. उर्वरित नुकसान भरपाई त्याच्या पुढील दोन ते तीन दिवसात निरक्षण करुन केली जाणार आहे.तसेच हिंसाचारातील पीडितांच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणात खाण पुरवले जात आहे. तसेच ज्यांची घरे पूर्णपणे खाक झाली आहेत त्यांना राहण्यासाठी मोठे तंबू उभारले जाणार आहेत. गुरुवारी केजरीवाल यांनी स्थानिकांची भेट घेतली होती. त्यावेळी हिंसाचारात मृत झालेल्यांच्या परिवाराला दहा लाख रुपयांची मदत करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.(Delhi Violence: अरविंद केजरीवाल यांची हिंसाचाराच्या घटनास्थळी जमावबंदी, लष्काराला बोलवण्याची मागणी)
Delhi CM @ArvindKejriwal briefs Media on an Important Issue
Watch Live 👇 https://t.co/OYohUBNgEO
— AAP (@AamAadmiParty) February 28, 2020
दिल्ली हिंसाचारात जखमी किंवा मृतांच्या परिवाराल दिलासा देण्यासाठी काही पावले उचलली आहेत. जे लोक जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मात्र जे खासगी रुग्णालयात उपचार करणार असल्यास त्यांनी फरिश्ते स्कीम अंतर्गत योजनेचा फायदा घेऊ शकणार आहे.तसेच केजरीवाल यांनी असे ही म्हटले आहे की, ज्या व्यक्ती यामध्ये आरोपी आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. जर आम आदमी पार्टीचा कोणताही व्यक्ती दोषी असेल तर त्याला दुप्पट शिक्षा दिली जाणार आहे