पुलवामा मध्ये आतंकवाद्यांचा पुन्हा एकदा निर्दयी हल्ला, 'रमजान ईद'च्या दिवशी मुस्लिम महिलेची गोळी घालून हत्या
Muslim Women Killed In Pulwama On Ramadaan Eid (Photo Credits: ANI)

श्रीनगर: सण उत्सवाच्या पवित्र दिवशी निर्दयी आतंकी हल्ला करून निष्पापांचा प्राण घेण्याच्या घटना मागील काही दिवसात प्रकर्षाने समोर आल्या होत्या. आज देखील आतंकवाद्यांनी रमजान ईद (Ramadan Eid) च्या दिवशीच एका मुस्लिम महिलेवर गोळीबार करून हत्या केल्याचे समजत आहे. या हल्य्यात आणखीन एका तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या उपचार चालू आहेत. पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील काकापोरा (Kakapora)  येथील नरबाल (Narbal)  या गावात बुधवारी सकाळी ही घटना घडली असून आता परिसरात पुन्हा एकदा भीतीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच आर्मीच्या जवानांनी या परिसरात घेराव घालून शोध मोहिमेला सुरवात केली आहे.

ANI ट्विट

पुलवामा जिल्ह्यात आज ईद च्या निमित्ताने आनंद साजरा होत असतानाच सिंगू नरबाल या गावात एका महिलेवर व तरुणावर गोळ्या चालवण्यात आल्या. यामध्ये गोळी लागून गंभीर जखम झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला तर जखमी तरुणाला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी या महिलेची ओळख पटवत तिचे नाव नगीना बानो असल्याचे सांगितले आहे.नगिना यांच्या पतीचा देखील अशाच प्रकारे एका आतंकी हल्य्यात बळी गेला होता. Pulwama Terror Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी SBI ची नवी सुविधा

पुलवामा परिसरात या आधी 14 फेब्रुवारीला देखील दहशतवादी हल्ला झाला होता ज्यामध्ये तब्बल 40 सीआरपीएफ जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर 30 मे पर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार या परिसरात एकूण 52 जवानांचा यावर्षी बळी गेला आहे. काश्मीर किंवा लगतच्या परिसरात नेहमीच दहशतवादी हल्ल्यांमुळे नागरिकांना असुरक्षित वातावरणात राहावे लागते त्यात आज ईदच्या दिवशी मुस्लिम महिलेवर झालेला हा हल्ला माणुसकीला काळिमा फासणारा आहे.