Pulwama Terror Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी SBI ची नवी सुविधा
SBI new service to collect donation for Pulwama Attack Martyrs (Photo Credit: Twitter @TheOfficialSBI)

Pulwama Terror Attack: जम्मू काश्मीर (Jammu And Kashmir) येथील पुलवामा (Pulwama) भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे (CRPF) 40 जवान शहीद झाले. त्यानंतर शहीदांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी अनेक लोक, संस्था, दिग्गज पुढे सरसावले आहेत. यातच देशातील सर्वात मोठी सरकारी 'बँक स्टेट बँक ऑफ इंडिया'ने (SBI) देखील शहीद कुटुंबियांच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. 'भारत के वीर' या अॅप किंवा वेबसाईटवरुन शहीदांच्या कुटुंबियांना अशी करा आर्थिक मदत

शहीद जवानांच्या कुटुंबियांपर्यंत मदत पोहचावी यासाठी SBI एक पर्याय उपलब्ध करुन देत आहे. या माध्यमातून तुम्ही जी काही रक्कम दान कराल ती शहीदांच्या कुटुंबियांपर्यंत पोहचेल. यासाठी तुम्हाला एसबीआयकडून जारी करण्यात आलेला UPI कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर रक्कम थेट 'Bharat Ke Veer' च्या अकाऊंटमध्ये जमा होतील.

'Bharat Ke Veer' या वेबसाईटवर दान केलेली रक्कम शहीद कुटुंबियांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा होईल. मात्र रक्कम जमा करता वेबसाईट तपासून पाहणे गरजेचे आहे. वेबसाईट ओपन करताना त्या लिंकमध्ये gov.in आहे की नाही ते लक्षपूर्वक पहा. युआरएल (URL) मध्ये gov.in शिवाय इतर काही असल्यास त्या साईटवर दान करु नका.

एसबीआय शिवाय तुम्ही पेटीएमच्या माध्यमातूनही शहीदांच्या कुटुंबियांना मदत करु शकता. यासाठी सर्वप्रथम पेटीएम अॅप ओपन करा. तिथे तुम्हाला इतर पेमेंट ऑप्शनसह 'Contribute CRPF Bravehearts' हा ऑप्शन दिसेल. त्या लिंकवर क्लिक करा. तिथे तुमचे नाव, PAN नंबर आणि दानाची रक्कम टाका. त्यानंतर पिन किंवा पासवर्ड टाकून पेमेंट प्रक्रीया पूर्ण करा.