जम्मू कश्मीर मध्ये पोलिसांसोबतच्या चकमकीत 3 दहशतवादी ठार
Security forces in Jammu & Kashmir | File Image | (Photo Credits: PTI)

जम्मू कश्मीर मध्ये पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये आज (20 जानेवारी) झालेल्या चकमकीमध्ये 3 दहशतवादी ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. कश्मीर झोन पोलिसांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांकडून काही वस्तू, हत्यारं ताब्यात घेण्यात आल्या आहे. जम्मू कश्मीर मधील Shopian भागामध्ये झालेल्या धुमश्चक्रीमध्ये पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये झालेल्या चकमकीत ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळेस कश्मीर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणेतील जवान उपस्थित होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दहशतवादी शोपिया मधील घरांमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर भारतीय जवानांनी या भागामध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले. त्यानंतर फायरिंग केल्यानंतर दहशतवादी ठार झाले. सध्या या मृत दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. 26 जानेवारीला होणाऱ्या दहशवादी हल्ल्याचा कट उधळला; जम्मू-काश्मीर पोलिसांकडून 5 दहशवाद्यांना अटक.  

ANI Tweet  

प्रजासत्ताक दिनाच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी कश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कट उधळून लावण्यात यश आल्याचे कश्मीर पोलिसांनी सांगितले आहे.