Image used for representational purpose. (Photo Credit: Wikimedia commons)

कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू (Tamil Nadu) सरकारने बैलांवर नियंत्रण मिळवण्याच्या ‘जल्लीकट्टू’ (Jallikattu) या खेळाचे आयोजन करण्यास परवानगी दिली आहे. जल्लीकट्टू हा तामिळनाडूचा पारंपारिक खेळ असून काही अटींसह या खेळला मान्यता देण्यात आली आहे. हा खेळ आयोजित करण्यासाठी सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्यामते, 150 पेक्षा जास्त लोक जल्लीकट्टूमध्ये सहभाग घेऊ शकणार नाहीत. खेळात भाग घेत असलेल्या खेळाडूंना त्यांचे कोरोना नकारात्मक प्रमाणपत्र द्यावे लागेल. या व्यतिरिक्त, कार्यक्रमस्थळी प्रेक्षकांच्या एकूण क्षमतेच्या केवळ 50 टक्केच लोकांना एकत्र येण्यास परवानगी असेल.

जल्लीकट्टू ही तामिळनाडूमधील जवळजवळ 400 वर्षांची जुनी परंपरा आहे. जल्लीकट्टू हा पोंगल सणाचा एक भाग आहे, जो तामिळनाडूमध्ये 15 जानेवारीला नवीन येणाऱ्या पिकांसाठी साजरा केला जातो. जल्लीकट्टू उत्सवापूर्वी गावकरी बैलांचा सराव घेतात. बैल मातीच्या ढिगाऱ्यावर आपली शिंगे घासतो आणि या खेळाची तयारी करतो. बैलाला दाव्याशी बांधले जाते आणि त्याला उकसवण्याची तयारी केली जाते,  जेणेकरून तो चिडेल आणि आपल्या शिंगांनी हल्ला करेल.

जल्लीकट्टूसाठी जास्तीत जास्त 300 सहभागी आणि अजून एक खेळ इरुधु विधुम निगाझची (Erudhu Vidum Nigazhchi) साठी 150 सहभागींना परवानगी देण्यात आली आहे. सरकारकडून देण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, कार्यक्रमात प्रवेश करण्यापूर्वी प्रेक्षकांचे थर्मल स्कॅनिंग केले जाईल. सर्वांना सामाजिक अंतराचे पालन करावे लागेल त्याशिवाय मास्क घालणे अनिवार्य असेल. जानेवारी 2021 मधील या खेळाच्या ऑपरेशनसाठी तपशीलवार मानक ऑपरेटिंग प्रक्रिया स्वतंत्रपणे जारी केली जाईल. (हेही वाचा: ब्रिटनहून भारतात आलेले 20 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; देशात भीतीचं वातावरण)

प्राचीन काळी स्त्रिया पती निवडण्यासाठी जल्लीकट्टू खेळाचा आधार घेत असत. जल्लीकट्टू हा खेळ स्वयंवराप्रमाणे आयोजित करण्यात येत असे, ज्यामध्ये जो कोणी योद्धा बैलावर मात करण्यास यशस्वी होत असे, स्त्रिया त्याला आपला नवरा म्हणून निवडत असत. जल्लीकट्टू या खेळाचे नाव 'सल्ली कासू' पासून बनले आहे. सल्ली म्हणजे नाणे आणि कासू म्हणजे शिंगात बांधलेला.