अनिल अंबानी यांच्या रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स कंपनीला  IRDAI चा झटका; यापुढे एकही नवी विमा पॉलिसी विकता येणार नाही
Anil Ambani| (Photo Credits: PTI/File)

देशातील प्रसिद्ध आणि दिग्गज उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani)  यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (Insurance Regulatory and Development Authority म्हणजेच आयआरडीएआय ( IRDAI) ने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स (Reliance Health Insurance) कंपनीवर नवे प्रतिबंध लादले आहेत. या प्रतिबंधानुसार रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स कंपनी आता यापुढे एकही नवी पॉलिसी विकू शकणार नाही.

आयआरडीएआयने माहिती देताना म्हटले आहे की, सॉल्वेन्स मार्जिन कायम ठेवण्यात अनेक वेळा अवधी देऊनही रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स कंपनी त्यात यशस्वी होऊ शकली नाही. त्याुमळे रिलायन्स कंपनीच्या नव्या पॉलिसी विकण्यावर प्रतिबंध लादण्यात आले आहेत. तसेच, रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या सर्व पॉलिसी धारककांची जबाबदारी आणि वित्तीय एसेस्ट 15 नोव्हेंबर पर्यंत रिलायन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडे हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले आहेत. (हेही वाचा, कर्जबाजारी झालेल्या अनिल अंबानी यांनी विकायला काढले BIG FM; तब्बल 1200 कोटींना ठरला व्यवहार)

दरम्यान, 15 नोव्हेंबर नंतर रियान्स हेल्थ इन्शुरन्सचे कोणतीही एसेट क्लेम सेटलमेंट शिवाय इतर कार्यावरही प्रतिबंध घालण्यात आल्याचे Insurance Regulatory and Development Authority ने म्हटले आहे.