India's COVID-19 Recovery Rate: देशात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 63.02 टक्के; आजवर 5,71,459 जणांनी केली कोरोनावर मात
Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

Coronavirus In India: देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 9 लाखांचा टप्पा पार केला आहे. मागील 24 तासांत 28,498 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 553 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या वाढीमुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 9,06,752पोहचला आहे. त्यापैकी 3,11,565 अॅक्टीव्ह केसेस (Active Cases) आहेत तर एकूण 23,727 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या सगळ्या वाढत्या आकडेवारीत दिलदायक वृत्त असे की, देशातील कोरोना रुग्णांच्या रिकव्हरी रेट मध्ये सुद्धा वाढ होत आहे. सध्या च्या अपडेटनुसार, आज घडीला देशात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 63.02 टक्के आहे. आजवर 5,71,460 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिली आहे. Coronavirus: भारत या आठवड्यात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णसंख्येत 10 लाखांचा टप्पा पार करेल- राहुल गांधी

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत, एकट्या महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही 2,60,924 वर पोहचली आहे.आजवर 1,44,507 जणांनी कोरोनवर मात केली असून 10,482 जणांचा या जीवघेण्या विषाणूने मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट हा ५५ % इतका आहे.

PIB ट्विट

दरम्यान, देशात महाराष्ट्राच्या पाठोपाठ तामिळनाडू, दिल्ली, गुजरात आणि पश्चिम बंगाल या राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. या राज्यात सुद्धा रिकव्हरी रेट समाधानकारक असल्याचे समजतेय. देशातील 19 राज्यांमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.