नौदल होणार सक्षम, भारताला मिळणार 8 नवीन अँटी सबमरीन
प्रतिनिधिक फोटो (Photo Credits: IANS)

Kolkata: भारतीय नौदलाच्या (Indian Navy) क्षमतेत वाढ करण्यासाठी येत्या काळात 8 नवीन अँटी सबमरीन वॉटर क्राफ्टची (Anti- Submarine Warfare Water Craft) निर्मिती करण्यात येणार आहे. सुरक्षा यंत्रणेशी निगडित गार्डन रिच शिपबिल्डींग अँड इंजिनिअर्स (Garden Reach Shipbuilders And Engineers LTD) या कंपनीसोबत सोमवारी हा करार करण्यात आला आहे. या वेळी जीआरएसईच्या मुख्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार या आठ वॉटर क्राफ्ट्सची किंमत ही 6311.32 कोटी रुपये इतकी असणार आहे. सोमवारी झालेल्या करारानंतर 42 महिन्यांच्या अंतर्गत पहिल्या वॉटर क्राफ्टचे वितरण करण्यात येईल. आता समुद्रात वाढणार भारताची ताकद, ताफ्यात सामील होणार 24 MH60 रोमिओ सी हॉक हेलिकॉप्टर

या नंतर प्रत्येक दोन वर्षांनी एक अशा स्वरूपात या वॉटर क्राफ्ट्सचे वितरण करण्यात येणार आहे. करार झाल्याच्या 84 महिन्यात ही योजना पूर्ण होईल, असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. जीआरएसई ही कोलकाता स्थित कंपनी तूर्तास नौदलाशी निगडित अनेक  प्रमुख योजनांवर देखील काम करत आहे.