इंडियन नेव्ही (Photo Credit: File Photo)

नवी दिल्ली : जम्मू काश्मीर (J&K)  मधून कलम 370 हटवल्यावर पाकिस्तानच्या (Pakistan)  अनेक संतप्त प्रतिक्रिया समोर येत होत्या. मागील काही दिवसात पाकिस्तान दहशतवादी संघटनांना भारतावर हल्ला करण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचे सुद्धा म्हंटले जात आहे. इतकंच नव्हे तर स्वतः पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांनी सुद्धा आता पुन्हा एकदा पुलवामा घडण्याची शक्यता आहे असे विधान करत हल्ल्याचा इशारा दिला होता. याच पार्शवभूमीवर आता पाकमधील दहशतवादी संघटना 'समुद्री जिहाद'चा कट रचत असल्याची माहिती भारताच्या गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. ज्यावर खबरदारी म्हणून भारतीय नौदला (Indian Navy) ला हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

भारतीय नौदलाचे उपप्रमुख मुरलीधर पवार यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात पाकमधील दहशतवादी संघटना आपल्या हस्तकांना 'समुद्री जिहाद' मध्ये समुद्र मार्गाने हल्ला करण्याचे प्रशिक्षण देत आहेत अशी माहिती दिली. तसेच हा कट उलथून लावण्यासाठी नौदल हाय अलर्टवर असून माहिती मिळताच सागरी किनारपट्टीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानचा किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा हल्ला मोडीत काढण्यासाठी नौदल सज्ज आहे. कोणालाही जशास तसं प्रत्युत्तर देण्याची आमची तयारी आहे”, असं देखील पवार म्हणाले. काश्मीर मधून कलम 370 हटवून BJP अल्पसंख्यांकांना चिरडू पाहत आहे- पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान

दरम्यान, सोमवारी जम्मू-काश्मीरबाबतच्या ऐतिहासिक निर्णयानंतर भारतीय लष्कर आणि भारतीय वायू दल हाय अलर्टवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर आता भारतीय नौदलासाठीही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर जेवढी सतर्कता बाळगण्यात आली तेवढीच सतर्कता बाळगण्याचा इशारा नौदलाला देण्यात आला आहे.तर देशातस्वातंत्र्य दिन व ईदच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.