नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारच्या नेतृत्वाखाली काल म्हणजेच 5 ऑगस्ट रोजी भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला. ज्यानुसार,जम्मू आणि काश्मीर (Jammu & Kashmir) यांना विशेष अधिकार देणारे कलम 370 व 35 A हे काढून टाकण्यात आले. या निर्णाणयानंतर जागतिक राजकारणात देखील बरीच चर्चा होत होती. अनेक बड्या नेत्यांनी या निर्णयाला पाठिंबा दर्शवला तर पाकिस्तान (Pakistan) सारख्या काही देशांनी अपेक्षित कारणांसह हा निर्णय चुकीचाअसल्याचे मत मांडले. यात पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांची प्रतिक्रिया देखील नुकतीच समोर आली आहे. इमरान यांनी ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रीयेनुसार कलम 370 हटवून भाजप (BJP) सरकार आपल्या वर्णभेदी प्रवृत्तीचा दाखला देत असल्याचे म्हणत यापासून अल्पसंख्यांकांचे रक्षण करण्यासाठी आपण संयुक्त राष्ट्राचे (United Nations) दार ठोठावाण्याची तयारी दर्शवली आहे. Jammu and Kashmir: काय होतं जम्मू-कश्मीरमधलं कलम 35A आणि 370, जाणून घ्या सविस्तर
खरतर, काश्मीर प्रश्नी भारत व पाकिस्तान या देशांचे वाद हे सर्वज्ञात आहेत, त्यामुळे इतक्या मोठया निर्णयानंतर पाकिस्तानची प्रतिक्रिया महत्वाची ठरते. इमरान यांनी या निर्णयाचा निषेध करत यामुळे येत्या काळात पुलवामा सारखी अन्य एखादी घटना घडू शकते अशी शक्यता वर्तवली आहे.जम्मू कश्मीर मध्ये Article 370 रद्द झाल्यानंतर भौगोलिक रचना,राष्ट्रध्वज यांच्यासोबत बदलणार या '10' गोष्टी
ANI ट्विट
Pakistan Prime Minister Imran Khan at the Joint Session of Parliament: We will take the case of Kashmir to the United Nations & apprise the International community of the treatment of minorities in India under the racist ideology of the BJP. (File pic) pic.twitter.com/XW5FiXsB28
— ANI (@ANI) August 6, 2019
दरम्यान या निर्णयानंतर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा हा निर्णय मोदी सरकारने एकतर्फी विचारातून घेतला असल्याचे म्हंटले होते. या विचारणे देशाचे कोणतेही भले होणार नाहिऊळात काश्मीर वासियांची अजूनच परवड होईल अशीही विधाने समोर येत होती.