भारताचं नंदनवन समजलं जाणारं कश्मीर मागील 70 वर्षांपेक्षा अधिक काळापासून धुमसत आहे. कलम 370 आणि कलम 35 A यामुळे जम्मू कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा होता. मात्र आज सकाळी (5 ऑगस्ट) गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी राज्यसभेत कलम 370 हटवणार असल्याचे निवेदन दिले. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर अनेक प्रतिक्रिया समोर येण्यास सुरूवात झाली. काहींनी या निर्णयाच्या समर्थनार्थ तर काहींनी त्याच्या निषेधार्थ मत प्रदर्शन केलं. संसदेमध्येही हा गोंधळ असल्याने सामान्यांना नेमकं काय चाललयं? हेच समजत नव्हतं. म्हणूनच कश्मीर सह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेले हे कलम रद्द झाल्यानंतर काय होणार? हे जाणून घ्या. Jammu and Kashmir: काय होतं जम्मू-कश्मीरमधलं कलम 370, जाणून घ्या सविस्तर
#1. जम्मू कश्मीर संविधान
कलम 370 रद्द झाल्यानंतर जम्मू कश्मीर आणि त्याच्या नागरिकांना वेगळं संविधान नसेल.
#2. नागरिकत्व
आता जम्मू कश्मीरच्या नागरिकांना एकच आणि समान नागरिकत्त्व मिळेल.
#3. प्रॉपर्टीचा मालकी हक्क
जम्मू कश्मीरमध्ये आता इतर राज्यातील नागरिकदेखील प्रॉपर्टी विकू किंवा विकत घेऊ शकतात.
#4. राष्ट्रध्वज
जम्मू कश्मीरचा आणि भारताचा असा वेगवेगळा झेंडा नसेल. आता जम्मू, कश्मीरसह देशभरात तिरंगा फडकेल.
#5. नागरिकांचे हक्क
भारतीय नागरिकांसोबतच आता जम्मू कश्मीरमधील नागरिकांनादेखील समान हक्क मिळणार आहेत.
#6. समान कायदा
आता जम्मू कश्मीरमध्ये नागरिकांना भारतातील इतर राज्यांप्रमाणे एकच कायदा पाळवा लागणार आहे.
#7. केंद्र सरकारचा कायदा
केंद्र सरकारचा कायदा आता थेट जम्मूमध्ये लागू करता येणार आहे. आर्थिक आणीबाणी देखील Article 360 अंतर्गत लागू करता येणार आहे.
#8. भौगोलिक रचना
जम्मू आणि कश्मीर आणि लद्दाख हे केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता जम्मू कश्मीरच्या इतिहासासोबतच भूगोलही बदलणार आहे. जम्मू-कश्मीर आणि लद्दाख यांच्या रुपात देशाला मिळाले 2 नवे केंद्रशासित प्रदेश, येथे वाचा भारतीय राज्यासह UTs ची पूर्ण माहिती
#9. राष्ट्रगान
आता जम्मू कश्मीरमध्येही जन गण मन हेच राष्ट्रगान असेल.
#10. संसदेचा निर्णय
आता जम्मू कश्मीरमध्ये कोणताही निर्णय लागू करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही. त्यामुळे आता राज्याचं नाव, सीमा बदलणं केंद्र सरकारच्या हातामध्ये येणार आहे.
5 ऑगस्टच्या मध्य रात्रीपासूनच जम्मू कश्मीरच्या खोर्यात राजकीय, सैन्याच्या हालचालींना वेग आला होता. त्यानुसार आता राज्यसभा आणि लोकसभेमध्ये निवेदन मांडल्यानंतर आता 5 वाजता मतदान होणार आहे.