सध्या कोरोना विषाणू (Coronavirus), त्यात लादण्यात आलेले लॉक डाऊन (Lockdown) यांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर (Indian Economy) गंभीर परिणाम झाले आहेत. भारताचा जीडीपी (GDP) बराच खाली घसरला आहे. मात्र पुढच्या काही वर्षांमध्ये या परिस्थितीत बदल घडू शकतो. जपानला (Japan) मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था 2050 पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आणि दुसर्या क्रमांकावर चीन असेल. लॅन्संट मेडिकल जर्नलच्या (Lancet Medical Journal) अभ्यासामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. या जर्नलमध्ये जगभरातील देशांमध्ये कार्यरत लोकसंख्येविषयी अभ्यास केला गेला आहे.
2017 मध्ये भारत जगातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती. याच पार्श्वभूमीवर या अभ्यासामध्ये म्हटले आहे की 2030 पर्यंत भारत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. 2030 मध्ये भारताच्या पुढे अमेरिका, चीन आणि जपान असतील. सध्या भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. फ्रान्स आणि ब्रिटन भारतापेक्षा पुढे आहेत. केंद्र सरकारचा अंदाजही तसा आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार यांनी यावर्षी मे महिन्यात सांगितले होते की, 2047 पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. मात्र, कोरोना विषाणूचा साथीचा रोग आणि त्याचा अर्थकारणावर होणारा परिणाम पाहता, सध्याचा अंदाज कमी आशावादी वाटतो.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जपानच्या सेंटर फॉर इकोनॉमिक रिसर्च (Center for Economic Research, Japan) ने त्यांच्या एका संशोधनात सांगितले की, 2029 पर्यंत जापानला मागे टाकून भारत जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनेल. जपानचा अंदाज कोरोना व्हायरस आउटब्रेक होण्यापूर्वीचा आहे. आता सध्याच्या साथीमुळे, असा अंदाज आहे की 2025 पर्यंत भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्यासही विलंब लागू शकतो. (हेही वाचा: महिलांवरील वाढत्या अत्याचाराला चाप बसवण्यासाठी गृह मंत्रालयाने जारी केली नवी नियमावली)
चीन आणि भारतात कार्यरत लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, असा इशारादेखील लाँसेट पेपरने दिला आहे. यावेळी, नायजेरियातील कार्यरत लोकसंख्या वाढेल. मात्र, असे असूनही, कार्यरत लोकसंख्येच्या बाबतीत भारत अव्वल स्थानावर असेल. त्यात म्हटले आहे की 2100 पर्यंत भारत जगातील सर्वाधिक काम करणारी लोकसंख्या राहील. त्यानंतर नायजेरिया, चीन आणि अमेरिका यांचा क्रमांक लागेल.