Coronavirus (Photo Credits-Twitter)

भारतामधील कोरोना विषाणूच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेमध्ये देशातील एका नवीन व्हेरिएंटमुळे चिंता निर्माण झाल्या आहेत. आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की कोरोना विषाणूचा इंडिअन व्हेरिएंट (Indian Covid-19 Variant) 44 देशांमध्ये पसरला आहे. हा प्रकार 'जागतिक चिंतेचा प्रकार' म्हणून घोषित केला गेला आहे. कोरोनाचा  B.1.617 हा व्हेरिएंट मागच्या वर्षी आढळून आला होता. संयुक्त राष्ट्र संघाची संस्था वरचेवर याचे आकलन करत आहे की, संक्रमणाचा प्रसार आणि तीव्रतेच्या बाबतीत सार्स सीओव्ही-2 नमुन्यामध्ये काही बदल घडले आहेत का? किंवा राष्ट्रीय आरोग्य अधिकाऱ्यांनी अंमलात आणलेल्या सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपायांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.

ग्लोबल हेल्थ एजन्सीने आपल्या साप्ताहिक अपडेटमध्ये म्हटले आहे की, ऑक्टोबरमध्ये भारतात प्रथम ओळखल्या गेलेल्या कोरोनाच्या बी 1617 प्रकारांच्या 4500 सिक्वेन्सना, डब्ल्यूएचओच्या सर्व सहा क्षेत्रांतील 44 देशांमधून 11 मे पर्यंत जीआयएसएडी ओपन एक्सेस डेटाबेसमध्ये अपलोड केले गेले होते. डब्ल्यूएचने या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. चिंताजनक स्वरूप ते असतात, जे व्हायरसच्या मूळ स्वरूपापेक्षा बरेच धोकादायक मानले जातात. विषाणूच्या कोणत्याही रूपामुळे उद्भवणाऱ्या व्हेरिएंटमध्ये संसर्ग करण्याचा धोका जास्त असतो. असे प्रकार जास्त प्राणघातक आणि लसांना अधिक प्रतिकार करतात.

डब्ल्यूएचओने म्हटले आहे की बी.1.617 मुळे संसर्ग पसरण्याचा धोका अधिक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य मंडळानेही प्राथमिक पुरावे उद्धृत केले आहेत, जे असे सूचित करतात की, बी.1.617 प्रकार रूग्णांमधील उपचारांची प्रभावीता कमी करतो. कोविड-19 चा बी.1.617 व्हेरिएंट पहिल्यांदा ऑक्टोबर 2020 मध्ये भारतात दिसला होता. (हेही वाचा: राज्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत पुन्हा वाढ? आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय)

एजन्सीने म्हटले आहे की, याच प्रकारामुळे भारतामधील कोरोना रुग्णांची संख्या व मृत्यू वाढले असावेत. मात्र भारतामधील संसर्ग वाढण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतील असे डब्ल्यूएचओ म्हटले आहे, त्यामध्ये मुख्यत्वे धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांचा समावेश आहे.