
हायपरलूप (Hyperloop) ही एक प्रस्तावित उच्च-वेगाची वाहतूक प्रणाली आहे, जी प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी वापरली जाऊ शकते. 2023 साली उद्योजक एलोन मस्क यांनी या संकल्पनेची माहिती दिली. आता रेल्वे मंत्रालयाच्या मदतीने आयआयटी मद्रासने भारतातील पहिल्या हायपरलूप प्रणालीसाठी 422 मीटर लांबीचा चाचणी ट्रॅक तयार केला आहे, ज्यामुळे केवळ 30 मिनिटांत 350 किमीचे अंतर पार करता येणे शक्य होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने निधी दिलेला हा प्रकल्प आयआयटी मद्रास कॅम्पसमध्ये आहे, जिथे रेल्वे लवकरच त्यांचा पहिला व्यावसायिक प्रयत्न सुरू करणार आहे.
पाचवा वाहतुकीचा मार्ग' म्हणून ओळखली जाणारी हायपरलूप ही एक हाय-स्पीड ट्रान्झिट सिस्टीम आहे, जी मोठ्या प्रवासासाठी डिझाइन केलेली आहे. त्यात व्हॅक्यूम ट्यूबमध्ये प्रवास करणारे पॉड्स वापरले जातात, जे कमीत कमी घर्षण आणि हवेच्या प्रतिकारासह अत्यंत उच्च गतीचे असतात. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर ही बातमी शेअर केली आणि लिहिले की सरकार-शैक्षणिक सहकार्य भविष्यातील वाहतुकीत नवोपक्रमांना प्रोत्साहन देत आहे. अशाप्रकारे भारतातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एक मोठी क्रांती होणार आहे.
India's First Hyperloop Test Track:
Watch: Bharat’s first Hyperloop test track (410 meters) completed.
👍 Team Railways, IIT-Madras’ Avishkar Hyperloop team and TuTr (incubated startup)
📍At IIT-M discovery campus, Thaiyur pic.twitter.com/jjMxkTdvAd
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) December 5, 2024
जर चाचणी यशस्वी झाली तर हे तंत्रज्ञान भारतातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बदलू शकते. अशी अपेक्षा आहे की लवकरच या हायपरलूप ट्रॅकवर ट्रायल रन सुरू होतील. त्याच्या यशस्वी चाचणीनंतर, देशातील महानगरे या नवीन वाहतूक व्यवस्थेशी जोडली जातील. हे तंत्रज्ञान केवळ जलदच नाही तर अत्यंत ऊर्जा-कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक देखील असेल. हायपरलूप भविष्यात भारतीय प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास देण्याचे स्वप्न साकार करू शकते. बुलेट ट्रेनच्या शर्यतीत भारत चीन, जपानसारख्या देशांपेक्षा मागे असला तरी, वाहतुकीच्या या नवीन पद्धतीत भारत अनेक विकसित देशांसोबत खांद्याला खांदा लावून चालत आहे. (हेही वाचा: Mumbai Metro Line 3 Trial Runs: धारावी ते आचार्य अत्रे चौक या मुंबई मेट्रो अॅक्वा लाइन 3 ची ट्रायल रन सुरू, येथे पाहा व्हिडीओ)
दरम्यान, हायपरलूप तंत्रज्ञानाच्या विकासात अनेक अडचणी येत आहेत, ज्यात आर्थिक, पायाभूत सुविधा, आणि नियामक अडथळे समाविष्ट आहेत. काही स्टार्टअप्स आणि कंपन्यांनी या अडचणींमुळे आपले प्रकल्प थांबवले आहेत. मात्र, स्विस टीम आणि इतर संशोधक या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत, ज्यामुळे भविष्यात उच्च-वेगाच्या प्रवासाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.