Coronavirus In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 96,424 नव्या कोरोनाबाधितांची भर; एकूण रूग्ण संख्या 52  लाखांच्या पार
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

भारतामध्ये कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 52 लाखांच्या पार गेला आहे. दरम्यान आज मागील 24 तासांमध्ये भारतामध्ये 96,424 नव्या रूग्णांची भर पडली आहे. तर 1,174 जणांची कोरोना व्हायरस (Coronavirus)  विरूद्धची झुंज अयशस्वी ठरली आहे. सध्या देशात कोरोना व्हायरसची लागण झाल्याने कोविड 19 (COVID 19) वर उपचार घेणार्‍यांची संख्या 10,17,754आहे. तर आत्तापर्यंत एकूण 84,372 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरामध्ये एकूण कोरोनाबाधित देशांच्या यादीमध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे.  देशातील 60% सक्रीय रुग्ण केवळ 5 राज्यांमध्ये; 13 राज्यांमध्ये कोविड-19 च्या 5000 हून कमी Active Cases.

आयसीएमआर कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 6,15,72,343 सॅम्पलची आत्तापर्यंत चाचणी झाली आहे. तर केवळ 17 सप्टेंबर दिवशी 10,06,615 सॅम्पल कोविड 19 साठी तपासण्यात आले आहेत.

ANI Tweet

भारतामध्ये सध्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 52,14,678 पर्यंत पोहचली आहे. तर 41,12,552 जणांचा मृत्यू झाला आहे. 84,372 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. यामध्ये देशात महाराष्ट्रामधून नियमित 25% रूग्णांची भर पडत आहे. मुंबई, पुणे या शहरांसोबतच आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही कोरोना झपाट्याने फोफावत आहे.

दरम्यान भारताकडे अद्याप कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी ठोस उपचार किंवा लस नाही. देशात 3-4 लसी प्रामुख्याने मानवी चाचणीच्या विविध टप्प्यामध्ये आहेत. तोपर्यंत आरोग्य प्रशासन आणि सरकारकडून नागरिकांना नियमित मास्क परिधान करण्याचे, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आणि हात वारंवार धुण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि पोस्ट कोविड देखील आयुर्वेद, योग साधना यासारख्या पर्यायी उपचार पद्धतींचा वापर करण्यास सांगितलं जात आहे.