Rahul Gandhi | (Photo Credits: Facebook)

काग्रेस (Congress) पक्ष माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर बुधवारी पुन्हा एकदा भारत-चीन सीमावाद (India-China Border Dispute) मुद्द्यावरुन प्रश्न विचारला आहे. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, चीनी सैनिक भारतीय सीमेत घुसले होते किंवा नाही? याबाबत केंद्र सरकार देशातील जनतेला स्पष्टपणे सांगावे. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रश्न विचारला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवर प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्ताचे काही दाखलेही दिले आहेत.

दरम्यान, राहुल गांधी यांनी या आधी केद्र सरकारवर 29 मे या दिवशी हल्ला चढवला होता. त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, चीनसोबत सीमावाद संबंधी केंद्र सरकारचे मौन हे संकट काळात शक्यता आणि अनिश्चिततेला कारण ठरत आहे. भारत सरकारने हे स्पष्ट करायला हवे आणि देशातील जनतेला काय ती स्थिती स्पष्टपणे सांगायला हवी. (हेही वाचा, भारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार)

ट्विट

व्हिडिओ कॉन्फरन्सींग द्वारे केलेल्या एका पत्रकारपरिषदेत राहुल गांधी यांनी 26 मे या दिवशी म्हटले होते की, सीमेवर काय झाले याची माहिती केंद्र सकारने देशातील नागरिकांना दिली पाहिजे. पुढे बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले की, नेपाळसोबत काय आणि कसे झाले, लद्दाखमध्ये काय होते आहे हे सर्व सरकारने स्पष्ट करावे. लद्दाख आणि चीन हा एक ज्वलंत मुद्दा आहे. त्यात पारदर्शकता हवी.