भारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार
President Donald Trump | (Photo Credits: AFP)

अमेरिकामध्ये (America) कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) दररोज हजारो लोकांचा जीव जात आहे. अमेरिका चीनवर कोरोना व्हायरसचा प्रसार केल्याचा आरोप करत आहे. कारण चीनच्या वुहान शहरामधून कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आहे. भारत-चीनच्या तणावपूर्ण संबंधावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, अमेरिका भारत आणि चीन दरम्यानचा सीमा वाद सोडवण्यास मध्यस्थी करण्यास तयार आहे.

यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. परंतु, यावर भारत सरकारने आपला वैयक्तिक मुद्दा असल्याचं म्हणत दुसऱ्या देशातील नेत्यांना मध्यस्थी करण्यावरून फटकारलं होतं. (हेही वाचा - Coronavirus in US: कोरोना व्हायरसमुळे 1 लाखाहून अधिक मृत्यू झालेला अमेरिका ठरला पहिला देश; जाणून घ्या संक्रमित रुग्णांची आकडेवारी)

दरम्यान, न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी भारत आणि चीन यांच्यातील लडाख सीमा वादावर मोठं वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतावर कोणी डोळे दाखवू शकत नाही. चीनचा सध्या अमेरिका आणि भारताबरोबर वाद सुरु आहे. दोन्ही देशांबरोबर चीनचे संबंध ताणले गेले आहेत. सैन्यबळाचा वापर करुन तैवानचा जबरदस्तीने चीनमध्ये समावेश करण्याची मागणी स्थानिक पातळीवर होत आहे.