Tragic Diwali In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सहारनपूर (Saharanpur) मधून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. दिवाळीत फटाके फोडताना एका आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मुलाने फटाका पेटवून त्यावर काचेचा ग्लास ठेवला. त्यानंतर काच फुटली आणि काचेचे तुकडे त्याच्या गळ्यात घुसले. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला आहे. मुलाच्या मृत्यूमुळे त्याच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
प्राप्त माहितीनुसार, ही घटना मोहल्ला महाजन, टिट्रो येथे रात्री 9.45 च्या सुमारास घडली. अशोक कुमार यांचा मुलगा वंश (10) घराबाहेर फटाके फोडत होता. त्याने फटाका पेटवला तेव्हा त्याचा स्फोट झाला आणि काचेचे तुकडे त्याच्या मानेवर व गळ्यात घुसले. त्यांच्या मानेतून रक्त वाहू लागले. वंशला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. (हेही वाचा -Mumbra-Shilphata Fire: मुंब्रा-शिळफाटा परिसरात सिलेंडरचा स्फोट; आगीत चार दुकाने जळून खाक)
पोलीस अधीक्षक सागर जैन यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, वंश हा टिट्रो येथील त्याच्या घराबाहेर फटाके फोडत असताना गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेत असताना मुलाचा मृत्यू झाला. सणासुदीच्या दिवशी या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. (हेही वाचा - Mumbai Fire: मुंबईत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आगीच्या तीन घटना; कोणतीही जीवितहानी नाही)
फटाक्यावर काचेचा ग्लास ठेवल्याने स्फोटानंतर गळ्यात काचेचे तुकडे घुसल्याने 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू -
⚠️ Disturbing Visual⚠️
सहारनपुर, यूपी में 8 साल के वंश ने दिवाली बम के ऊपर कांच का ग्लास रख दिया। बम फूटा और कांच का टुकड़ा गले में जा घुसा। वंश की मौत हो गई। @AmitGup96968797 pic.twitter.com/MWzzwrduNR
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) November 2, 2024
पीडित कुटुंबीयांनी सुरुवातीला मुलाला स्थानिक डॉक्टरांकडे नेले. त्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांनी त्याला गंगोह सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. मात्र, वंशचा वाटेत मृत्यू झाला. अशोक यांना वंशसह दोन मुलं होते. हे कुटुंब नुकतेच शामली जिल्ह्यातून या शहरात आले होते. शुक्रवारी शोकाकुल वातावरणात मुलाचे अंत्यसंस्कार करण्यात आले.