सध्या देशभरात मोठ्या थाटामाटात दिवाळीचा सण साजरा होत आहे. महाराष्ट्रात आज लक्ष्मीपूजन पार पडले. मात्र आनंदाच्या पर्वाला गालबोट लागणाऱ्या काही घटना समोर आल्या आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवसी मुंबईमध्ये आगीच्या तीन घटना घडल्या. पहिली आग माटुंगा पोलीस लाईनजवळील शिधावाटप कार्यालयात लागली. दुसरी आग अंधेरी पूर्वेकडील महाकाली रस्त्यावरील झोपडपट्टीत लागली, माहितीनुसार, फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत सुमारे 50 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर हब मॉल गोरेगावजवळील उंच इमारतीच्या 30 व्या मजल्यावर तिसरी आग लागली. या आगीचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. (हेही वाचा: Thane Shocker: ठाण्यातील उच्चभ्रू इमारतीच्या 22 व्या मजल्यावरून उडी मारून 45 वर्षीय महिलेची आत्महत्या)

Mumbai Fire: 

Mumbai Fire:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)