Monsoon | Representative Image (Photo Credits: Pixabay)

दरवर्षी पावसाकडे डोळे लावून बसणाऱ्या बळीराजासाठी यंदा अत्यंत आनंदाची बातमी आहे. यंदा वरुनराजा प्रसन्न आहे. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षाही अधिक पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (IMD Monsoon forecast) वर्तवत असलेल्या अंदाजानुसा (IMD Monsoon Prediction) यंदा सरासरीच्या 101% इतका पाऊस पडू शकतो. यंदाचा मान्सून (Monsoon Rainfall 2021) हा नेहमीच्या तुलनेत सामान्यच राहणार असला तरी पर्जन्यवृष्टी मात्र पूर्ण क्षमतेने म्हणजेच 100% च्या आसपास होण्याची शक्यता आहे. भारतात प्रामुख्याने जून ते सप्टेंबर या काळात मान्सून बरसेल असे हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. दरम्यान, संपूर्ण मान्सून हंगामात पाऊस जर 96% ते 104% पडला तर या पर्जन्यवृष्टीला सामान्य मान्सून म्हणून ओळखले जाते.

आयएमडी (IMD) म्हणजे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की, यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनंध्ये पर्जन्यवृष्टी 92% ते 108% इतकी होऊ शकते. हाच मान्स दख्खनच्या पठारावर 93% ते 108% इतका कोसळू शकतो. याशिवाय उत्तर पूर्व भारतातही मान्सून दमदार हजेरी लावण्याची शक्यता आहे. उत्तर पूर्व भारतात 95% तर मध्य भारतात 106% इतका पाऊस डपण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, जुलै महिन्या पर्जन्यमान कसे राहील याबाबत आयएमडी जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा अंदाज वर्तवणार आहे.

आयएमडीने देशातील विभागवार वर्तवलेले मान्सून भाकीत

  • पूर्व भारत- सर्वसाधारण पर्जन्यवृष्टी
  • मध्य भारत- सर्वसाधारण पर्जन्यवृष्टी
  • हिमालय आणि मध्य पूर्व भारत- सर्वसाधारण पर्जन्यवृष्टी
  • उत्तर पूर्व भारत- सर्वसाधारण स्थितीपेक्षा कमी पाऊस
  • दक्षिण भारत (दख्खनचं पठार)- सर्वसाधारण स्थितीपेक्षा कमी पाऊस
  • उत्तर पूर्वेकडील- सर्वसाधारण स्थितीपेक्षा कमी पाऊस

आयएमडी ट्विट

दरम्यान, परवा म्हणजेच येत्या 1 जूनपासून मान्सून केरळमध्ये दाखल होईल असे हवामान विभागाने म्हटले होते. मात्र, हवामान विभागाने वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार मान्सून 3 मेपासून केरळात दाखल होणाची शक्यता आहे. दरम्यान, अरबी समुद्रात तौक्ते वादळ निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात नुकीतच पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे मान्सूच्या पावसाबाबत जी उत्सुकता असते ती उत्सुकता फारशी राहिली नसली तरी शेतीसाठी आवश्यक असलेल्या मान्सूनचे महत्त्व कायमच अबादीत आहे.