देशात सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरने (ICMR) केलेल्या पहिल्या राष्ट्रीय सेरो सर्व्हेचे निकाल (Sero Survey Results) समोर आले आहेत. यामध्ये, मेच्या सुरूवातीस, 0.73% किंवा तब्बल 64 लाख (64,68,388) लोक कोरोना विषाणूच्या संपर्कात आल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. सर्वेक्षणानुसार प्रत्येक आरटी-पीसीआर चाचणीत (RT-PCR Test) एक कन्फर्म कोरोना सकारात्मक घटना उघडकीस आली आहे. हे सर्वेक्षण 11 मे 2020 ते 4 जून 2020 दरम्यान करण्यात आले होते, त्यामध्ये रक्ताच्या नमुन्यांतील 'कोविड कावच ईलिसा' किटचा वापर करून, इम्यूनोलोबिन-जी अँटीबॉडीजची (Immunoglobulin G) 28,000 लोकांची तपासणी केली गेली.
यामध्ये 18 ते 45 वयोगटातील सर्वाधिक 43.3 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज असल्याचे आढळले. त्यानंतर 46 ते 60 वर्षे वयोगटातील 39.5 टक्के आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 17.2 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या. सर्वेक्षण अहवालात असे म्हटले आहे की, '2020 च्या मध्यापर्यंत भारतातील, 64,68,388. लोकांना कोरोना विषाणूची लागण होण्याचे दिसून येत आहे.’
या सर्वेक्षणामधून दिसून आले आहे की, सध्या ग्रामीण भागात संसर्गाच्या घटना जातस आहेत, यानुसार ग्रामीण भागात 69.4%, शहरी स्लममध्ये 15.9% आणि शहरी नॉन-स्लममध्ये 14.6% संसर्ग आढळला आहे. सरो सर्वेक्षणानुसार, जिल्हा किंवा शहरातील किती लोक कोरोना संसर्गाने बरे झाले आहेत हे शोधून काढले जाऊ शकते. (हेही वाचा: भारतात गेल्या 24 तासात 96,551 कोरोनासंक्रमितांची नोंद तर 1209 जणांचा बळी; देशातील COVID19 चा आकडा 45 लाखांच्या पार)
संक्रमित झालेल्यांपैकी 18.7 टक्के लोक असे होते, ज्यांच्या कामामुळे ते इतर कोरोना संक्रमित लोकांच्या संपर्कात आले असावेत. बहुतेक जिल्ह्यांमध्ये हे संक्रमण कमी होते (मेच्या सुरुवातीच्या काळात) ज्याद्वारे हे दिसून येते की भारत कोरोना साथीच्या सुरुवातीच्या टप्प्यात होता. सर्वेक्षणात असेही म्हटले आहे की, राष्ट्रीय व स्थानिक पातळीवर असे आणखी सर्वेक्षण केले जावे जेणेकरून परिस्थितीचे अधिक चांगले मूल्यांकन करता येईल आणि त्यानुसार सार्वजनिक आरोग्यासाठी कंटेनमेंट धोरण आखले जावे.