हैदराबाद: सेक्सला नकार दिल्याने बार डान्सरचा कथित छळ, आरोपींना अटक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

हैदराबाद (Hyderabad) येथील एका बार डान्सरला तिने सेक्सला नकार दिल्याने तिचा कथित छळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पीडित बार डान्ससरला चार व्यक्तींनी जबदरस्त मारहाण केल्याचे सुद्धा पोलिसांनी सांगितले आहे.

पीडित बार डान्ससरने काही महिन्यांपूर्वी बागुपेठ येथे असलेल्या एका डान्स बारमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर काही दिवसानंतर बार डान्सरच्या मालकाने तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तसेच तिला विविध पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितले. परंतु बार डान्सरने लैंगिक संबंध ठेवल्यानंतर पैसे मिळणार का असे विचारले असता तिला चार लोकांनी तिचा कथित छळ करत जबरदस्त मारहाण केली.

(मित्रांसाठी चहा आणि भजी बनवायला सांगणं पडलं महाग, वैतागलेल्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा सापळा)

त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून एकाचा शोध घेतला जात आहे. तर महिलेचा छळ केल्याप्रकरणी विविध कायद्यांअतर्गत गुन्हा दाखल केला आहे.