Karnataka High Court (Photo Credits: ANI)

हिजाब प्रकरणात (Hijab Controversy) निर्णय देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे (Karnataka High Court) मुख्य न्यायाधीश रितु राज अवस्थी (Ritu Raj Awasthi) यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. न्यायालयाने हिजाब प्रकरणी 15 मार्च रोजी निकाल दिला होता. त्यावरुनच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओ जारी करत, ही धमकी देण्यात आल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, धमकीचे वृत्त पुढे येताच कर्नाटक सरकारने या प्रकरणात सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांना 'Y' दर्जाची सुरक्षा देण्याचे जाहीर केले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरु येथे बोलताना न्यायाधीशांना 'Y' दर्जाची सुरक्षा देण्याचे जाहीर केले आहे. बसवराज बोम्मई यांनी म्हटले की, हिजाब घालून निकाल देणाऱ्या तीनही न्यायाधीशांना आम्ही 'Y' श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी डीजी आणि आयजी यांना विधानसौधा पीएसमध्ये दाखल केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत ज्यात काही लोकांनी न्यायाधीशांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत, असेही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेंगळुरूमध्ये म्हटले. (हेही वाचा, Mumbai: 'हिजाब घातल्याने पत्नीला लोकलमध्ये बसायला दिली नाही जागा'; पतीचा सोशल मिडिया पोस्टद्वारे आरोप)

ट्विट

कर्नाटक राज्यात अनेक प्रदेशांमध्ये हिजाब (Hijab) वाद हा एक प्रमुख मुद्दा बनला होता. ज्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने या प्रकरणात निकाल देताना म्हटले की, हिजाब (Hijab) ही काही धार्मिक प्रथा नाही. दरम्यान, न्यायाधीशांना धमकी दिल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहताच एका वकिलाने तातडीने रजिस्ट्रालला एक पत्र लिहीले. या पत्रात त्यांनी मला माझ्या संपर्काच्या माध्यमातून सकाळी 9.45 वाजता व्हाट्सअॅपच्या माध्यमातून एक व्हिडिओ (Whatsapp Video) मिळाला. जो तमिळी भाषेमध्ये आहे. ज्यात न्यायधीशांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे.