पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यातील जलपाईगुडी जवळ झालेल्या रेल्वे अपघात (Train Accident) तीन जन ठार झाले आहेत तर 20 जण गंभीर जखमी झाले आहेत,अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये तर जखमींच्या कुटुंबीयांना 25 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा भारतीय रेल्वेने केली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे की, "मी पंतप्रधान मोदींशी बोललो आणि त्यांना बचाव कार्याबद्दल माहिती दिली. जलद बचाव कार्यासाठी मी वैयक्तिकरित्या परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे. बीकानेर-गुवाहाटी एक्सप्रेस (Bikaner Guwahati Express Derailed) रुळावरुन धावत असताना चार ते पाच डबे रुळावरुन हा अपघात घडला. पश्चिम बंगालमधील New Dimohani आणि New Maynaguri रेल्वे स्थानकादरम्यान ट्रेन क्रमांक 15633 बीकानेरहून (Bikaner ) गुवाहाटीकडे (Guwahati) जाताना सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास (साधारण 4 वाजून 53 मिनीटे) हा अपघात घडला.
अपघाताबाबत प्राप्त माहिती अशी की, अपघात घडला तेव्हा ट्रेनचा वेग साधारण प्रती तास 40 किलोमीटर होता. ट्रेन रुळावरुन धावत असताना अचानक झटका बसला आणि डबे रुळावरुन खाली घसरले. यात जवळपास तीन डबे उलटले. अपघात इतका भयावह होता की, डबे अक्षरश: एकमेकांवर चढले. एका डबयावर दुसरा डबा चढल्याने खालचा डबा दबला गेला. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), राजकीय रेल पोलीस, (जीआरपी) आणि स्थानिक अपत्ती निवारण पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरु केले. (हेही वाचा, Bikaner Guwahati Express Derailed: बीकानेर-गुवाहाटी एक्सप्रेस रुळावरुन घसरली; डबे एकावर एक चढल्याने मोठी जीवीत हानी झाल्याची भीती)
ट्विट
#UPDATE | Guwahati-Bikaner Express derailment: Ex gratia relief of Rs 5 lakhs for deceased, Rs 1 lakh for severely injured, and Rs 25,000 for those with minor injuries: Indian Railways
— ANI (@ANI) January 13, 2022
ट्विट
Guwahati-Bikaner derailment: "I've spoken with PM Modi and apprised him about the rescue operations. I'm personally monitoring the situation for swift rescue operations," tweets Railways Minister Ashwini Vaishnaw pic.twitter.com/IcXUf5NGIQ
— ANI (@ANI) January 13, 2022
प्रशासकीय आणि रेल्वे जवानांसह स्थानिक नागरिकांनीही मदत आणि बचाव कार्यास हातभार लावला. दरम्यान, अपघात नेमका कशामुळे घडला याची माहिती समजू शकली नाही. रेल्वे अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, या दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. आगोदर ट्रेनचे इंजनच उलटले आहे. दुर्घटनेच्या चौकशीसाठी एक समितीही नेमण्यात आली आहे. दरम्यान, मृतांची आणि जखमींची संख्या समजू शकली नाही.