Gujrat Accident: गुजरात मधील अमरेली येथे आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या जवळजवळ 10 जणांना चिरडले. यामध्ये 8 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्यावर आता स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.(Madhya Pradesh Crime: भोपाळमध्ये दुचाकी उचलल्याच्या रागात तरुणाने वाहतुक पोलिसावर केला हल्ला, आरोपीवर गुन्हा केला दाखल)
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ही घटना सावरकुंडला येथील बाढडा गावाजवळ झाली आहे. दुर्घटना मध्यरात्री 3 वाजताची असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर खळबळ उडाल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णायात उपचारासाठी हलवण्यात आले. या घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटले की, अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला मधील बरद गावाजवळ झालेल्या दुर्घटनेमुळे दु:खी आहे. घटनेतील लोकांना योग्य मदत द्यावी याचे निर्देशन सुद्धा दिले आहेत. राज्य सरकार या दुर्घटनेतील प्रत्येक पीडितच्या परिवाराला 4 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे.
Tweet:
કલેકટર અમરેલીને સમગ્ર ઘટનાની તાત્કાલિક તપાસ કરી અહેવાલ મોકલવાનો આદેશ કર્યો છે. પ્રભુ મૃતકોના આત્માને સદ્ગતિ અર્પે અને પરિવારને આ દુ:ખ સહન કરવાની શક્તિ બક્ષે એ જ પ્રાર્થના.
ૐ શાંતિ...
— Vijay Rupani (@vijayrupanibjp) August 9, 2021
त्याचसोबत या घटनेप्रकरणी तपास करुन त्याचा रिपोर्ट पाठवण्यात यावा असे निर्देशन दिले आहेत. तर पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केी आहे. सध्या त्याची चौकशी केली जात आहे. त्याचसोबत तो दारु पिऊन ट्रक चालवत होता का याबद्दल ही त्याला विचारले जात आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून कोणतेही अद्याप अधिकृत विधान समोर आलेले नाही.