Green Fungus (Photo Credits-Twitter)

पंजाब (Punjab) मधील जालंधर मध्ये ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. जालंधर सिव्हिल रुग्णालयाचे डॉक्टर परमवीर सिंह यांनी असे म्हटले की, या रुग्णाने नुकतीच कोरोनावर मात केली होती. त्याला निगराणी खाली ठेवण्यात आले होते. आता अधिक काही सांगू शकत नाही. यापूर्वी सुद्धा एक ग्रीन फंगसचा रुग्ण आला होता. पण त्याला नक्की तो आजार झाला आहे की नाही त्याची पुष्टी झाली नव्हती. डॉक्टर परमवीर सिंह यांनी पुढे असे म्हटले की, ग्रीन फंगसच्या रुग्णाला खोकला, छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या उद्भवतात. ग्रीन फंगसचे दुसरे नाव Aspergillosis असे आहे. या रुग्णावर आम्ही लक्ष ठेवून असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

भारतात ग्रीन फंगस व्यतिरिक्त ब्लॅक फंगस, व्हाइट फंगस आणि येल्लो फंगस सुद्धा आढळून आले आहे. या आठवड्यातच मध्य प्रदेशातील इंदौर शहरात ग्रीन फंगसचे प्रकरण समोर आले होते. मात्र नंतर त्याला पुढील उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात आले. या रुग्णाने कोरोनावर मात केली होती. डॉक्टरांनी असे म्हटले की, हा रुग्ण ब्लॅक फंगस असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आला होता. मात्र त्याला ग्रीन फंगसची लागण झाली आहे.(Coronavirus महामारीची दुसरी लाट उताराला, भारतात 81 दिवसांमध्ये सर्वाधिक कमी रुग्णांची नोंद, पाठिमागील 24 तासात 58,419 जणांना संक्रमण)

दरम्यान, ब्लॅक फंगसला महारोग म्हणून घोषित करण्यात आले आहे. ब्लॅक फंगस नंतर बिहार मधील पटना आणि उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये व्हाइट फंगसचे रुग्ण आढळले होते. तज्ञांच्या मते, व्हाइट फंगस हा ब्लॅक फंगसच्या तुलनेत सर्वाधिक धोकादायक आहे. तो फुफ्फुसांसह शरीरातील अन्य भागांवर सुद्धा परिणाम करतो. तर ग्रीन फंगस हा Mold Aspergillus च्या कारणामुळे होतो.