Twitter (Photo courtesy: Twitter)

भारत सरकारने (Government of India) ट्विटरच्या कार्यावर निराशा व्यक्त करत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ट्विटरवर फेक (Fake), व्हेरिफाय नसलेले (Unverified) आणि ऑटोमेडेट बॉट अकाऊंट (Automated Bot Accounts) वापरण्यास परवानगी कशी मिळते याबद्दल शंका निर्माण झाली आहे. असे अकाऊंट्सवर बंदी घातली गेली पाहिजे असे भारत सरकारचे म्हणणे आहे. (Delhi Violence: दिल्लीत झालेल्या शेतकरी चळवळीतील हिंसाचारानंतर Twitter ची मोठी कारवाई; 550 हून अधिक खाती केली निलंबित)

एएनआयने दिलेल्या अपडेटनुसार, भारताच्या आयटी सेक्रेटरी यांनी ट्विटरबद्दल निराशा व्यक्त केली आहे. ट्विटर आपल्या प्लॅटफॉर्मवरील चुकीचे आणि फेक अकाऊंटस हाताळण्यास असमर्थ असल्यामुळे ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसंच भारतात संविधान आणि कायदा मोठा असून देशातील कार्यरत असलेल्या सर्व व्यक्ती आणि संस्थांकडून त्या कायद्याचे पूरेपूर पालन होणे अनिवार्य असल्याची आठवणही त्यांनी ट्विटरला करुन दिली आहे.

ANI Tweet:

पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिने शेअर केलेल्या toolkit या अॅक्टीव्हीचा आशय देत आयटी सेक्रेटरी म्हणाल्या की,  ट्विटर फ्लॅटफॉर्मचा अशा प्रकारच्या कामासाठी केलेल्या वापरामुळे भारतामध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो, जे भारतात अस्वीकार्ह आहे.

भारतातील शेतकरी आंदोलनाबद्दल अफवा किंवा चुकीची माहिती पसरवणाऱ्या 500 हून अधिक ट्विटर अकाऊंट्सवर कार्यवाही करत ट्विटरने हे अकाऊंट्स बंद केले आहेत. भारतातील केंद्रीय सरकारने ट्विटरच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे सांगण्यात आल्यानंतर ट्विटरकडून हा निर्णय घेण्यात आला.