शासकीय नोकरी शोधत असल्यास तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय टपाल विभागात 1735 पदांसाठी नोकरभरती सुरु करण्यात आली आहे. या जागा दिल्ली (Delhi), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि झारखंड (Jharkhand) या विभागासाठी होणार आहेत.
अर्ज करणाऱ्यांनी भारतीय टपाल विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या. तर 12 जुलै पर्यंत तुम्ही अर्जाची नोंदणी करु शकणार आहात. तसेच दिल्लीसाठी -117 जागा, हिमाचल प्रदेश- 757 जागा आणि झारखंडसाठी-804 जागांवर भरती करण्यात येणार आहे. तर या अर्जासाठी पात्र ठरलेल्या तरुणांना सुरुवातीला 10 हजार रुपये प्रतिमहिना पगार दिला जाणार आहे.
तर अर्ज करण्यासाी जनरल. ओबीसी, ई़डब्ल्यूएस या वर्गतील उमेदवाराला 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. तर अन्य वर्गातील उमेदवारांना आणि महिलांना अर्जासाठी शुल्क भरावे लागणार आहेत. मात्र ग्रामीण टपाल सेवक पदासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला 10 वी मध्ये गणित आणि इंग्रजी विषयात पास असणे गरजेचे आहे.