रेमडेसिविर (Remdesivir) या औषधाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने या औषधाचा केंद्राकडून होणारा पुरवठा थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या औषधाचे उत्पादन 10 पटीने वाढले असून देशाची उत्पादनक्षमता प्रतिदिन 33,000 कुप्यांवरून 11 एप्रिल 2021 रोजी प्रतिदिन 3,50,000 कुप्या झाली, असे त्यांनी सांगितले.
सरकारने केवळ एका महिन्यात रेमडेसिविरचे उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांची संख्या 20 वरून 60 वर नेली. आता देशात या औषधाचा पुरेसा साठा असून त्याचा पुरवठा मागणीच्या प्रमाणात खूपच जास्त आहे, अशी माहितीही मांडविय यांनी दिली. मांडविय यांनी रेमडेसिविरच्या देशातील उपलब्धतेवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश राष्ट्रीय औषध दरनिश्चिती संस्था आणि सीडीएससीओ ला दिले आहेत. आकस्मिक गरजेसाठी राखीव साठा म्हणून भारत सरकारने रेमडेसिविरच्या 50 लाख कुप्या खरेदी करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. Buying Remdesivir? फेक रेमडेसिवीर कसे ओळखाल? IPS अधिकारी मोनिका भारद्वाज यांनी सांगितल्या टिप्स.
Mansukh Mandaviya ट्वीट
I am delighted and satisfied to inform you all that the Production of Remdesivir is ramped up ten times from
just ~33,000 vials/day on 11th April 2021 to ~3,50,000 vials/day today under the astute leadership of Hon'ble PM Shri @narendramodi Ji. (1/3) pic.twitter.com/Vy2RzrsYMQ
— Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) May 29, 2021
दरम्यान काही महिन्यांपूर्वी रेमडीसीवीरच्या तुटवड्यामुळे देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. रूग्णांचे नातेवाईक तासनतास रांगेत उभे होते.महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती होती. नंतर सरकारने रेमडीसीवीरच्या पुरवठयासाठी जिल्हाधिकार्यांकडे त्याच्या वितरणाचे अधिकार दिले होते. पण आता परिस्थिती सुधारली आहे. काही दिवसांपूर्वीच तिसर्या लाटेचा धोका पाहता रेमडीसीवीर सह अत्यावश्यक औषधांचा पुरेसा साठा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील जिल्हाधिकार्यांना केले आहे.