Gold, Silver Price Today:  सोने, चांदी दर घ्या जाणून, आज कितीने उतरले भाव
Jewellery (Photo Credits: Pixabay)

भारतीय सोने बाजारात 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा म्हणजेच प्रति 10 ग्रॅम 46,140 रुपये इतकी तर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा (Gold Price Today) 50,340 इतकी आहे. कालच्या (14 सप्टेंबर) तुलनेत आज सोने दरात (Gold Silver Rates Today 15th Septembe) किंचीत बदल झाल्याचे पाहयाला मिळत आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीचे दर आपल्या विक्रमी विक्रिपेक्षा 9 हजार रुपयांनी घसरले आहेत. सध्या सोने-चांदी दरात जरी घसरण पाहायला मिळाली तरी भविष्यात सोने-चांदी (Gold Jwellery) दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

गोल्ड रिटरन्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत 22 कॅरेचच्या 1 ग्रॅम सोन्याची किंमत Gold Silver Rates ) 4614 रुपये तर 8 ग्रॅम सोने 36,912 रुपये आहे. जर 100 ग्राम सोन्याबाबत बोलायचे तर त्याचा दर 4,61,400 रुपये इतका आहे. त्याच तुलनेत 24 कॅरेट सोन्याबाबत बोलायचे तर त्याचा दर प्रति 1 ग्रॅम 5034 रुपये म्हणजेच प्रति तोळा (10 ग्रॅम) सोन्याचा दर 50,340 रुपये आहे. दिल्ली सराफा बाजारात चांदी 62806 रुपये दराने विकली जात आहे.

दरम्यान, मुंबई आणि कोलकातामध्ये सोने प्रति 10 ग्राम (तोळा) 46,550 रुपये (24 कॅरेट) दराने विकलेल जात आहे. तर चेन्नईमध्ये प्रति तोळा 44,600, दराने विकले जात आहे. या महिन्यात (सप्टेंबर) सोने 700 ते 800 रुपये खाली उतरल्याचे पाहयाला मिळते आहे. (हेही वाचा, Mutual Fund Investment: विदेशी कंपन्यांच्या म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करावी काय? घ्या जाणून)

इंडियन बुलियन ज्वेलर्स एसोसिएशन (Indian Bullion Jewelers Association) ने दिलेल्या माहितीनुसार शुद्ध सोन्याची किंमत आपल्याला सांगितली जात आहे. ज्यात केवळ निव्वळ सोन्याचे दर सांगितले जातात. ग्राहक जेव्हा खरेदी करतो तेव्हा त्यात मूळ दरासोबत इतर कर (टॅक्स) आणि जो दागिना बनवला जात आहे त्याचा मजूरी दरही अंतर्भूत करुन दर सांगितला जातो. त्यामुळे ग्राहकाला सोने खरेदी मूळ रकमेपेक्षा काही प्रमाणात अधिक किमतीला पडू शकते. हे दर प्रत्येक ठिकाणानुसार वेगळे असू शकतात.