Gold-Silver Price | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने, चांदी दर (Gold-Silver Price Today) वधारल्याचे पाहायला मिळत आहे. सोने आणि चांदी हे दोन्ही धातू अत्यंत महागडे म्हणून ओळखले जातात. प्रामुख्याने भारतात या धातूला विशेष मागणी असते. त्यामुळे दररोज बदलणाऱ्या या धातूंच्या दराकडे सर्वसामान्य नागरिक आणि गुंतवणूकदारांसह व्यापाऱ्यांचेही लक्ष लागलेले असते. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सेने आज (1 जून) कालपेक्षा (31 मे) 261 रुपयांनी म्हणजेच 0.53% इतक्या प्रमाणात वाढले आहे. म्हणजेच सोने दर प्रति 10 ग्राम 49,049 रुपयांना विकल्याचे पाहायला मिळते आहे. पाहा आजचे सोने चांदी दर (Gold-Silver Price).

दरम्यान, चांदी दरातही काहीशी वाढ झाली असून चांदी प्रति किलो 72,500 रुपये दराने विकली जात आहे. आज (मंगळवार, 1 जून) चांदी 701 रुपयांनी म्हणजेच 0.97% इतकी वधारली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या घसरणीनंतर चांदी आज सावरताना दिसत आहे. आज चांदी दर प्रती किलो 72,000 रुपये दराने विकली जात आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील सोने, चांदी दर

शहराचे नाव सोने दर (per 10 gram, 22Ct) चांदी दर (per kg)
नवी दिल्ली  46,880 रुपये 71,200 रुपये
मुंबई 46,710 रुपये 71,200 रुपये
कोलकाता 48,290 रुपये 71,200 रुपये
चेन्नई 46,290 रुपये 76,800 रुपये
हैदराबाद 45,910 रुपये 76,800 रुपये

डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने आणि महागाई वाढल्याने सोने-चांदी दरात मंगळवारी पाच महिन्यांनंतर उच्चांक गाठला. न्यूयॉर्क येथील कमोडिटी एक्स्चेंज कॉमेक्सवर सोने दर वाढता दिसला. त्याचा परिणाम म्हणून दिल्ली, मुंबई येथील सराफा बाजारातही मोठी दरवाढ पाहायला मिळाली.

कालचा (31 मे) सोने दर

दरम्यान, चांदी दराबाबत सांगायचे तर आज (31 मे 2021) रोजी चांदी 71,600 रुपए प्रति किलो दराने विकली जात आहे. दिल्लीमध्ये चांदी प्रति किलो 71,600 रुपए प्रति किलो विकली जात आहे. तर मुंबई आणि कोलकाता शहरात चांदी एकाच दराने (71,600 रुपए प्रति किलो) विकली जात आहे. चेन्नई शहरात चांदी प्रति किलो 76,200 रुपए भावाने विकली जात आहे.