
कोरोना व्हायरस महामारीच्या दरम्यान सोन्या-चांदीच्या (Gold-Silver Rate) दरात जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनच्या काळात वाढलेले सोन्याचे दर तुळशीच्या लग्नानंतर हळूहळू कमी झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर थोड्याफार प्रमाणात देशात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होतच राहिले. आजच्या ताज्या अपडेट्सनुसार, मुंबईत 24 कॅरेट (24 Carat) सोन्याचा दर प्रतितोळा 49,260 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट (22 Carat) सोन्याचा दर 48,260 रुपये प्रतितोळा आहे. कालच्या किंमतीनुसार, आजच्या सोन्याचा दरात थोडीशी घट झालेली पाहायला मिळत आहे.
मुंबईसह देशातील अन्य राज्यातही सोन्या-चांदीच्या दरात थोड्याफार प्रमाणात घसरण झालेली आहे. देशात नवी दिल्ली, जयपूर आणि लखनौ मध्ये सोन्याचे भाव सर्वाधिक आहेत.हेदेखील वाचा- Indian Economy: पुढील वर्षी भारतीय कंपन्यांसाठी व्यवसायाची परिस्थिती चांगली राहील; Moody's ने वर्तवले सकारात्मक भविष्य
पाहूयात महत्त्वाच्या शहरांतील सोन्याचा आजचा (11th December) भाव
शहर | 24 कॅरेट/प्रतितोळा | 22 कॅरेट/प्रतितोळा |
मुंबई | 49,260 रुपये | 48,260 रुपये |
पुणे | 49,260 रुपये | 48,260 रुपये |
चेन्नई | 50,600 रुपये | 46,390 रुपये |
हैदराबाद | 50,070 रुपये | 45,900 रुपये |
नवी दिल्ली | 52,430 रुपये | 48,060 रुपये |
बंगळूरू | 50,070 रुपये | 45,900 रुपये |
दरम्यान मुंबईत चांदीचा दर प्रतिकिलो 63,410 रुपये इतका आहे. ही किंमत goodreturns या संकेतस्थळावरून देण्यात आली आहे.
शुद्ध सोने कसे ओळखले जाते?
सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916, किंवा 875 असे अंक लिहलेले असतात. याच अंकावरून सोन्याची शुद्धता लक्षात येते. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर, सोने 24 कॅरेट असते. 999 चा अर्थ असा आहे की, यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर, 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात.
सध्याच्या डिजिटल युगात तुम्ही डिजिटल सोन्यात देखील गुंतवणूक करु शकता. हा देखील गुंतवणूकीचा एक सुरक्षित पर्याय असल्याचे तज्ञ सांगतात. विशेष म्हणजे डिजिटल किंवा पेपर गोल्ड ही एका प्रकारची गुंतवणूक असून गरजेच्या काळी तुम्ही याची विक्री करु शकता. या डिजिटल गोल्डमध्ये तुम्ही कमीत कमी 1 रुपयांपासून गुंतवणूक करु शकता.