Gold Silver Price: दिवाळीत सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय? जाणून घ्या आजचे दर
Gold Jewelery | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

दिवाळी (Diwali) सण मध्यावर असूनही सोने दर (Gold Rate) मात्र स्थिर राहण्याची किमया घडली आहे. विशेष म्हणजे चांदी दरात (Silver Price) 100 रुपयांची वाढ होऊनही त्या तुलनेत सोने मात्र स्थिर आहे. दिवाळी सणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज (5 नोव्हेंबर) चांदी दरात 100 रुपयांची वाढ झाली. चोवीस कॅरेट सोने मात्र आहे त्याच किमतीला म्हणजेच प्रति 10 ग्रॅम 47,470 रुपये आहे. तर, चांदी प्रति किलो 62,500 रुपयांना विकले जात आहे. जाणून घ्या भारतातील प्रमुख शहरांतील सोने चांदी दर (Gold Silver Price).

राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 50,900 तर 22 कॅरेट सोने 46,700 रुपयांना विकले जात आहे. आर्थिक राजधानी मुंबई येथे 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 47,410 रुपयांना विकले जात आहे. 22 कॅरेट सोने 46,410 रुपयांना विकले जात आहे. हे दर जीएसटीशिवायचे आहेत. कोलकाता येथे 24 कॅरेटचे सोने प्रति 10 ग्रॅम Rs 50,550 रुपयांना तर 22 कॅरेटचे सोने प्रति 10 ग्रॅम 47,850 रुपयांना विकले जात आहे.

चेन्नई मध्ये 24 कॅरेटचे प्रति 10 ग्रॅम सोने 48,500 रुपये तर 22 कॅरेट सोने 44,470 रुपयांना विकले गेले. बंगळुरुमध्ये 24 कॅरेटचे सोने 48,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेटचे सोने प्रति 10 ग्रॅम 44,550 रुपये आहे. (हेही वाचा, Petrol, Diesel Price Today: एक्साईज ड्यूटी कमी केल्यानंतर तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेल दर)

सोने आणि चांदीच्या किमतीतील दैनंदिन चढउतार हे आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीतील बदलांसह अनेक घटकांवर अवलंबून असतात. MCX वर विशेष एक तासाच्या दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान गुरुवारी सोन्याच्या किमती किंचित वाढल्या. युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्व्ह आणि बँक ऑफ इंग्लंड या दोघांनीही त्यांचे व्याज अपरिवर्तित ठेवल्यानंतर हे बदल पाहायला मिळाले.

दरम्यान, देशभरात चांदीचा दर किलोमागे 100 रुपयांनी वाढून 62,500 रुपयांवर पोहोचला आहे. बंगळुरू आणि चेन्नई येथे एक किलोग्राम चांदीची किंमत अनुक्रमे 62,500 रुपये आणि 67,700 रुपये आहे, तर दिल्ली आणि मुंबईमध्ये विक्रीचा दर शुक्रवारी 62,500 रुपये होता.