Journalist Vikram Joshi Dies: भाचीची छेड काढल्याचा विरोध केलेल्या विक्रम जोशी यांचा गोळीबारानंतर उपचारा दरम्यान मृत्यू
journalist Vikram Joshi Dies | Photo Credits: Twitter/ ANI

गाझियाबादमध्ये पत्रकार विक्रम जोशी (Journalist Vikram Joshi) यांच्यावर सोमवार (20 जुलै) दिवशी गोळीबार झाला होता. त्यानंतर आज सकाळी त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे. भाचीची छेडछाड करणार्‍या तरूणांना विरोध केल्याने त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. दरम्यान त्यानंतर 9 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र विक्रम यांच्या पुतण्याने कमल-उद- दिन यांच्या मुलाने हल्ला केल्याचा दावा करत त्याला अटक होत नाही तो पर्यंत विक्रम यांचे पार्थिव ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. तसेच बुलेट्सचे घाव देखील गंभीर होते.

विक्रम यांच्या भाचीने 16 जुलै दिवशी काही तरुणांविरोधात पोलीस ठाण्यात छेडछाड केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. पोलिसात तक्रार दाखल केल्याच्या रागातून त्या अज्ञात तरुणांनी बदल्याच्या भावनेतून पत्रकार विक्रम जोशी यांना बेदम मारहाण करून गोळीबार केला. हा प्रकार सीसीटीव्हीमध्येही कैद झाला आहे. त्याचा अधिक तपास सुरू आहे.

ANI Tweet 

दरम्यान या घटनेनंतर देखील जोशी कुटुंबाकडून 3 जणांविरोधात पोलिस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चौकी इंचार्जला निलंबित करण्यात आलं आहे.