COVID19 वरील लस घ्या आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जिंका, महापालिकेचे नागरिकांना आवाहन
Covid-19 Vaccination |(Photo Credits: PTI)

नागरिकांनी कोरोनावरील लस घेण्यासाठी पुढे यावे यासाठी हिंगोली महापालिकेने एक मार्ग काढला आहे. त्यानुसार त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, जर तुम्ही कोरोनावरील लस घेतल्यास तुम्हाला बक्षीस दिले जाईल. जसे एलईडी टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशिनचा समावेश असेल असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी म्हटले आहे. अशाच प्रकारची घोषणा चंद्रपूर महापालिकेकडून सुद्धा करण्यात आली आहे. त्यांनी सुद्धा नागरिकांनी लस घ्यावी यासाठी ही युक्ती केली. मुंबई पासून 500 किमी असलेल्या हिंगोलीत 73 टक्के लोकांनी कोविड19 लसीचा पहिला डोस आणि 56 टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोनाची तिसरी लाटेची शक्यता असल्याने हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापलकर यांनी बुधवारी आपत्कालीन बैठक बोलावली होती. त्यामध्ये त्यांनी जिल्हाप्रशासन अधिकाऱ्यांना अधिकाधिक नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढे येण्यासाठी प्रोत्साहन करावे असे त्यांना सांगण्यात आले आहे.

महापालिकेचे कॉउंसिल चीफ अधिकारी डॉ. अजय कुरवडे यांनी 27 डिसेंबरला लकी ड्रॉ काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 2-24 डिसेंबर दरम्यान लस घेतलेल्यांचा समावेश असणार आहे.(Mumbai: प्रवाशांनी COVID19 नियम मोडल्यास आम्हाला का दंड? टॅक्सी, बस चालकांनी उपस्थितीत केला सवाल)

प्रथम विजेत्याला एलईडी टीव्ही दिला जाईल आणि त्यानंतरच्या विजेत्यांना वॉशिंग मशिन, रेफ्रिजरेटर, मिक्सर ग्राइंडर आणि अन्य पाच वस्तूंचा समावेश असेल त्यांनी म्हटले. परंतु जे नागरिक कोरोनावरील लस घेतील त्यांना या कॉन्टेस्ट मध्ये सहभागी होता येणार आहे.(Omicron Variant Scare: मुंबई एअरपोर्ट वर उतरणार्‍या देशांतर्गत प्रवाशांनाही आता Negative RT-PCR Report बंधनकारक; BMC ची माहिती)

दरम्यान, गेल्या वर्षातील कोरोनाच्या उद्रेकामुळे जिल्ह्यात 16,059 कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर 395 जणांचा बळी गेलाय आतापर्यंत 15,659 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या पाच अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.