Representational Image (Photo Credits: IANS)

Mumbai: कोरोनाच्या नव्या वेरियंटमुळे अधिक सतर्कता बाळगली जात आहे. अशातच राज्य सरकारने गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यास आधीपेक्षा आता अधिक दंड ठोठावला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांनी जर प्रवाशांनी कोविड19 चे नियम मोडल्यास त्याचा दंड बस आणि टॅक्सी चालकांना सुद्धा द्यावा लागणार आहे. यामुळेच त्यांनी आम्ही का दंड भरायचा असा सवाल उपस्थितीत केला आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून सुद्धा बाइकवरुन जाणाऱ्यांनी जरी मास्क घातला नसेल तरीही त्यांच्याकडून दंड स्विकारत आहेत.

नव्या गाइडलाइन्य नोव्हेंबर 27 रोजी राज्य सरकारने जाहीर केल्या. त्यानुसार, प्रत्येकवेळी नियम मोडल्यास 500 रुपयांचा दंड भरावा लागेल असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. तर चुक आढळून आल्यास टॅक्सी, खासगी कार किंवा बससह चालक, कंटक्टर किंवा हेल्पर ज्यांच्याकडून सेवा पुरवली जाते त्यांना 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. मात्र बससाठी 10 हजारांचा दंड वसूल करण्याचे आदेश दिले गेले आहेत. वारंवार नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना जप्त करण्यासह अधिसूचना मिळेपर्यंत मालकाने कंपनीत काम करणे बंद करावे.(Omicron Variant: कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांवरून केंद्र आणि महाराष्ट्र सरकारमध्ये संभ्रम)

दरम्यान, आतापर्यंत मुंबई पोलिसांकडून मास्क न घातल्यास 200 रुपये दंड (जुन्या गाइडलाइन्स) स्विकारला जात होता. परंतु नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या नव्या गाइडलाइन्समुळे दंडाच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस स्थानकाकडून अशा प्रकारे 100 जणांवर कारवाई केली जाते. परंतु अधिकाऱ्यांनी दंड स्विकारताना त्याचे वादात रुपांतर होण्यासह ट्राफिक जाम होणार नाही याची काळजी घ्यावी. तर बस आणि टॅक्सी चालकांनी प्रवाशांच्या चुकीमुळे त्यांना सुद्धा अतिरिक्त दंड भरावा लागणार असल्याच्या अधिसूचनेवर नाराजी व्यक्त करत त्याचा विरोध केला आहे.