FSSAI On Adulteration: भेसळ रोखण्यासाठी एफएसएसआय आक्रमक; दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर देशभरात ठेवली जाणार करडी नजर
FSSAI | (Photo Credit - Twitter/ANI)

दूध (Milk) आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये (Milk Products) होणारी भेसळ (Adulteration) रोखण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) आता अधिक कठोर पावले टाकणार आहे. एफएसएसएआयने सांगितले गुरुवारी (25 मे) सांगितले की, भेसळ रोखण्यासाठी सर्व पातळींवर प्रयत्न केले जाणार आहेत. इतकेच नव्हे तर त्यासाठी ते दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर देशव्यापी पाळत ठेवणार आहेत. ही मोहीम स्थानिक पातळीवरुन ते राष्ट्रीय पातळीपर्यंत सर्व स्तरावर राबिण्यातत येईल. ज्यामध्ये देशभरातील सर्व जिल्ह्यांमधील संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रांतील दूग्धजन्य उत्पादांचे नमुने गोळा करणे केले जातील.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने पुढे म्हटले आहे की, राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमधील संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रांतील नमुने गोळा करून हे संपूर्ण भारत निरीक्षण मोठ्या प्रमाणावर केले जाईल. शिवाय, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून खवा, मावा, पनीर, तूप, लोणी, दही आणि आइस्क्रीम यासारख्या उत्पादनांचे नमुनेही तपासले जातील. (हेही वाचा, FSSAI On Dahi Row: दही शब्दावरून भाषेच्या राजकारणाची घुसळन, एफएसएसआय द्वारे नवे निर्देश)

ट्विट

FSSAI म्हणजे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत ही एक स्वायत्त संस्था आहे, जी देशातील अन्न उत्पादनांची सुरक्षा आणि मानकांचे नियमन आणि देखरेख करण्याचे काम करते. ग्राहकांना उपलब्ध अन्न सुरक्षित, आरोग्यदायी आणि भेसळमूक्त आहे की नाही हे तपासणे हे FSSAI चे प्राथमिक उद्दिष्ट आहे. हे अन्न उत्पादनांसाठी मानके सेट करते आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्यांचे उत्पादन, प्रक्रिया, संचयन, वितरण आणि विक्री नियंत्रित करते.