Flash Flood In Himachal Pradesh | (Photo Credit - Twitter/ANI)

Heavy Rainfall In Himachal Pradesh: उत्तर आणि वायव्य भारतात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिल्ली ( Delhi), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), हिमाचल प्रदेश अशा अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेश राज्यात तर अचानक आलेल्या पुरामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. काही ठिकाणी रस्ते खचले आहेत, वाहने पाण्यात वाहून गेले आहेत. तर काही रहिवासी इमारती आणि परिसर जलमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल (Himachal Pradesh Flash Flood Videos) झाले आहेत.

घर कोसळून एकाच कुटुंबातील तीन ठार, दोन जखमी

हिमाचल प्रदेशातील शिमला येथे रविवारी मुसळधार पावसामुळे घर कोसळल्याने एकाच कुटुंबातील एकूण तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले, पोलिसांनी सांगितले की, रविवारी सकाळी शिमलाच्या कोटगढ गावात ही घटना घडली. (हेही वाचा, North India Rain: उत्तर भारतात मुसळधार पाऊस, हिमाचल प्रदेशात अलर्ट जारी)

अनेक ठिकाणी अचानक पुर, रस्तेही खचले

रविवारी पहाटे भारतातील हिमाचल प्रदेशातील लाहौल आणि स्पीती जिल्ह्यातील ग्रम्फू गाव आणि छोटा धरा यांना अचानक पूर आला आणि भूस्खलनही झाले. कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे AEC BRO 94 RCC, NH 505 (Sumdo Kaza-Gramfu) मार्गावर अडथळा निर्माण झाला आहे.

व्हिडिओ

हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी, शिमलामध्ये, गुरुवारी कोटी आणि सनवारा दरम्यानचा रेल्वे ट्रॅक मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळे बंद झाला. "शिमल्यात मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळे कोटी रेल्वे स्टेशन आणि बोगदा क्रमांक 10 येथील संवारा रेल्वे स्टेशन दरम्यानचा रेल्वे ट्रॅक गुरुवारी बंद करण्यात आला," असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

व्हिडिओ

दरम्यान, राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये शनिवारी जोरदार पाऊस झाला, ज्यामुळे अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर पाणी साचले आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दक्षिणेकडील, केरळच्या काही भागात सकाळच्या वेळी मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे वाहतूक खोळंबली आणि सखल भागात पाणी साचले.