प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

भारतात कोट्यावधी वरिष्ठ नागरिक फिक्स डिपॉझिट (FD) मध्ये पैशांची गुतंवणूक करणे पसंद करतात. कारण वरिष्ठांना फिक्स डिपॉझिटवर व्याजदर अधिक दिला जातो. या व्याजदराचाच बहुतांश वरिष्ठ उपयोग करताना दिसून येतात. मात्र बुधवारी देशातील सर्वात मोठ्या एसबीआय (SBI) बँकेने ग्राहकांना झटका दिला आहे. बँकेने 1-2 वर्षासाठी ठेवलेल्या एफडीवरील व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे आता अन्य बँकासुद्धा एसबीआयच्या पावलावर पाऊल ठेवत फिक्स डिपॉझिटवरील व्याजदरात कपात करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वरिष्ठ नागरिक, सेवानिवृत्ती मिळालेल्या व्यक्ती ज्या एफडीवर निर्भर आहेत त्यांच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकते.

आरबीआयने (RBI) आदेश दिला आहे की, व्याजदरात एससीएलआर मुळे नाही तर रेपो रेट संबंधित अधिक माहिती असणे आवश्यक आहे. कारण रेपो रेट प्रत्येक वेळोवेळी बदलत राहतो. त्यामुळेच जमा झालेल्या रक्केमवर ही व्याजदर सातत्याने बदलतो. परंतु 50 लाख रुपयांची एफडीवर वर्षभरासाठीचे 5 हजार रुपयांचे व्याज मिळणार आहे. एसबीआयच्या नुसार, जवळजवळ 4.1 कोट्यावधी वरिष्ठ नागरिकांच्या एफडी खात्यात तब्बल 14 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत.

तर एटिका वेल्ख मॅनेजमेंटचे एमडी आणि सीईओ गजेंद्र कोठारी यांनी असे म्हटले की, सीनियर सिटिझन्सला बचत खात्यात 15 लाख रुपये आणि अन्य रक्क सरकारच्या 7.75 टक्के देणाऱ्या फिक्स डिपॉझिमध्ये गुतंवणे हा उत्तम पर्याय आहे. मात्र या दोन्ही योजना टॅक्स अंतर्गत येतात. तसेच म्युचअल फंड या पर्यायाचा सुद्धा वरिष्ठांना फायदा होऊ शकतो.(SBI बॅंकेचे व्याजदार पुन्हा झाले स्वस्त; दिवाळीसोबत आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर MCLR दरांमध्ये 6 व्यांदा कपात)

सध्या केंद्र सरकारकडून वरिष्ठांना दिलासा देण्याची शक्यता असल्याने लवकरच एका महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा करण्यात येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, एससीएसएस वरील टॅक्सवर कपात सरकारकडून केली जाऊ शकतो. या योजनेअंतर्गत 60 वर्षावरील नागरिक 15 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करु शकतात.