कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. यासंदर्भातील अधिक माहिती देण्यासाठी आज पुन्हा एकदा अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी दुपारी 4 ची वेळ निश्चित करण्यात आली आहे. काल देखील निर्मला सीतारमण यांनी पत्रकारांशी संवाद साधत आर्थिक पॅकेज संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली होती. देशावर कोरोना व्हायरसचे संकट असताना MSME सेक्टरला कोणत्याही शाश्वतीशिवाय 3 लाख कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे. तसंच पगारदार वर्गासाठी देखील अर्थमंत्र्यांनी दिलासादायक घोषणा केली. कर्मचाऱ्यांच्या पगारातून कंपनीकडून कापला जाणारा पीएफचा हिस्सा 12% ऐवजी 10% करण्यात आला आहे. तसंच कर्मचाऱ्यांच्या TCS/TDS मध्ये 25% कपात होणार असल्याने हाती येणारा पगार अधिक असेल.
विशेष म्हणजे इन्कम टॅक्स भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्ही 30 नोव्हेंबर पर्यंत इन्कम टॅक्स भरु शकता. कोविड 19 च्या संकटात गरिब आणि व्यावसायिकांना मोठी मदत करण्यासाठी हे पॅकेज असून याद्वारे शेतकरी, श्रमिक आणि मध्यमवर्गीयांना देखील दिलासा देण्यात येणार आहे. (लोकल ब्रांड ग्लोबल करण्यावर विशेष लक्ष्य, नागरिकांच्या खात्यात पैसे थेट जमा; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजबाबत माहिती)
ANI Tweet:
Delhi: Finance Minister Nirmala Sitharaman will address a press conference today at 4 PM. (file pic) pic.twitter.com/GN4gIsd5qy
— ANI (@ANI) May 14, 2020
कोरोना व्हायरसच्या संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली. त्यामुळे या संकटात देशाला स्वावलंबी होण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांची तरतूद मोदी सरकारकडून करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या रक्कमेचा नेमका कुठे, कसा वापर केला जाईल याची माहिती काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत अर्थमंत्र्यांनी दिली होती. त्यासंदर्भात अधिक तपशील आज अर्थमंत्री देतील. त्यामुळे आज अर्थमंत्री नेमक्या कोणत्या घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.