Atma Nirbhar Bharat Abhiyan: लोकल ब्रांड ग्लोबल करण्यावर विशेष लक्ष्य, नागरिकांच्या खात्यात पैसे थेट जमा; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजबाबत माहिती
Nirmala Sitharaman | (Photo Credits-ANI)

Atma Nirbhar Bharat Abhiyan: पंतप्रधान नरेंद्र मोदी (,PM Narendra Modi) यांनी काल (मंगळवार, 12 मे 2020) रात्री आत्मनिर्भर भारत अभियान (Atma Nirbhar Bharat Abhiyan) अंतर्गत 20 लाख कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले. केंद्रीय अर्थमंत्री (Union Finance Minister) निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज (बुधवार, 13 मे 2020) या पॅकेजबाबत विस्ताराने माहिती दिली. या पॅकेजबाबत माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, 20 लाख कोटी रुपयांचे हे विशेष आर्थिक पॅकेज हे सर्व पक्षांशी चर्चा करुन तयार करण्यात आले आहे. या पॅकेजमध्ये उद्योजगांना विचारात घेण्यात आले आहे. विकासदरात वाढ आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अशा पॅकेजची आवश्यकता होती.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या पत्रकार परिषदेची सुरुवात आत्मनिर्भर भारत अभियानाद्वारे केली. सीतारमण म्हणाल्या की, आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी एक नवा दृष्टीकोन सादर केला आहे. लोकल ब्रांड ग्लोबल बनविण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान महत्त्वपूर्ण ठरेन. हा एक आत्मनिर्भर भारत अभियानाचा भाग आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून काल भाषण केले. यात या पॅकेजबाबत केंद्रीय अर्थमंत्री विस्ताराने माहिती देतील, असे मोदी म्हणाले होते. त्यानुसार अर्थमंत्री सीतारमण या आज दुपारी 1 वाजता या पॅकेजबाबत माहिती देणार होत्या. मात्र, त्यांनी नियोजीत वेळेत बदल करत ही माहिती दुपारी 4 वाजता देण्यात येईल असे सांगितले. (हेही वाचा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 4 वाजता पत्रकारांशी साधणार संवाद; 20 लाख कोटी रुपयांचा कसा होणार वापर? याची देणार माहिती)

एएनआय ट्विट

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत देशातील विविध क्षेत्रांसाठी केंद्र सरकारने निर्धारीत करुन दिलेल्या निधीचा तपशील सांगितला. पंतप्रधानांनी सांगितल्यानुसार हे पॅकेज देशातील शेतकरी, छोटे-मोठे व्यावासाईक आणि सेवा क्षेत्र डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात आले आहे. यात स्थानिक पातळीवर विशेष व्यवस्था यार करण्याबाबत विशेष लक्ष देण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत देण्यात आलेले विशेष आर्थिक पॅकेज हे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) 10% इतके आहे. हे पॅकेज 2020 मध्ये 20 लाख 2020 आत्मनिर्भर भारत अभियानाला गती देईन. आत्मनिर्भर अभियानामध्ये लँड, लेबर, लिक्विडिटी आणि लॉ अशा सर्वांवर भर देण्यात आला आहे, असेही मोदी यांनी म्हटले होते.